मुख्यमंत्र्यांचा जपान दौरा :
"जपानी गुंतवणूकदारांनी भारताच्या विकासाच्या यशोगाथेत सहभागी व्हावे!' – मा. देवेंद्र फडणवीस

10421537 557877574365179 6258123241185537526 nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौर्‍यात 'महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी' या विषयावर टोकियो येथे आयोजित केलेल्या परिसंवादात जपानमधील व्यापार व वाणिज्य क्षेत्रातील उद्योजकांशी चर्चा केली. राज्यातील सर्व जपानी कंपन्यांच्या सोयीसाठी एक 'जपान डेस्क' उभारण्यासाठी घोषणा फडणवीस यांनी या परिसंवादामध्ये केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (जेट्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ८ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या चार दिवसांच्या दौऱ्यात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासमवेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), (एमआयडीसी) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यातील वरिष्ठ अधिकारीदेखील सामिल झाले. "जपानने ज्या पद्धतीने विकास केला, त्यामुळे आम्ही प्रभावित आहोत. जपानी गुंतवणूकदारांनी भारताच्या विकासाच्या यशोगाथेत सहभागी व्हावे, हे आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे.' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टोकियो आणि ओसाका येथील नेते आणि उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पाचारण केले. या भेटीदरम्यान मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला अर्थसहाय्य करणार्‍या जपानने ही गाडी नाशिक मार्गे न्यावी यासंबंधीच्या प्रस्तावाचा विचार करण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागतिक पातळीवर इलेक्ट्रिक मोटर्सचे उत्पादन करणार्‍या NIDEC कॉर्पोरेशन (Nihon Densan Kabushiki Kaisha), या कंपनीचे प्रतिनिधी लवकरच गुंतवणूकीच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी इथे भेट देणार आहेत. NIDEC कॉर्पोरेशनकडून हार्ड डिस्क ड्राइव्हस्, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व ऑटोमोबाईल्स साठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक मोटर्सची निर्मिती केली जाते.
या दौर्‍यात मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी 27 दशलक्ष टन मालाची हाताळणी करणार्‍या योकोहामा पोर्टला भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी केली. जपान मित्र संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या संघटनेने महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी जपान मध्ये एक पूर्तता केंद्र म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जपान दौरा नगर जिल्हय़ाला लाभदायक ठरणार

मुख्यमंत्र्यांचा जपान दौरा नगर जिल्हय़ाला लाभदायक ठरण्याची चिन्हे आहेत. जपानमधील ‘जेट्रो’ व महाराष्ट्राच्या मंत्री पातळीवरील गटात या गुंतवणुकीविषयी सहकार्य करार झाला आहे. जपानचे वाहतूक व पायाभूत सुविधामंत्री आकिहारो ओटा यांच्याशी याबाबत फडणवीस यांची चर्चा झाली. जपानमधील तीन ते चार उद्योजकांनी याआधीच सुपे औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्याबाबत उत्सुकता दर्शवली होती. या प्रस्तावांवर फडणवीस यांच्या या जपान दौर्‍यात शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. सुपे औद्योगिक वसाहतीचा अलीकडेच विस्तार करण्यात आला असून, त्यासाठी नव्याने भूसंपादनही करण्यात आले आहे. त्यामुळे या उद्योगांना येथे पुरेशी जागा आता उपलब्ध आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division