दृष्टिक्षेप
केंद्रीय अर्थसंकल्प २०१६-१७

औद्योगिक क्षेत्रासाठी तरतूदीindustry
• स्टार्ट अप इंडियासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एका दिवसात मिळणार
• स्टॅण्ड अप इंडियासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
• काही डिझेल वाहनावर २.५ टक्के तर इतर मोठय़ा वाहनांवर ४ टक्के प्रदूषण अधिभार
• चांदीव्यतिरिक्त इतर दागिन्यांवर १ टक्का उत्पादन शुल्क लागू
• मनरेगासाठी ३८,५०० कोटींची आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद
• बुडीत कर्जामुळे गोत्यात आलेल्या बँकांसाठी २५ हजार कोटी रुपये
• वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी तरुण उद्योजकांना संधी देणार
• अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 100 टक्के एफडीआय
• नवीन उद्योगांना व लघुउद्योगांना कॉर्पोरेट करात सवलत
• स्किल डेव्हलपमेंट स्कीमसाठी १७०० कोटींची तरतूद
• तंबाखूवर दोन टक्के अधिक उत्पादन शुल्क
• तीन वर्षांत एक कोटी तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

पायाभूत सोयीसुविधा
pradhan mantri gram sadak yojana• पंतप्रधान ग्राम सडक योजनेसह एकूण रस्ते विकासाकरिता ९७,००० कोटी रुपयांची तरतूद
• रस्ते आणि महामार्गाकरता ५५,००० कोटी रुपयांची तरतूद
• मे २०१८ पर्यंत देशातील सर्व गावागावांत वीज पोहोचवणार
• रस्ते आणि रेल्वेच्या विकासासाठी दोन लाख १८ हजार कोटी खर्च करणार
• वापरात नसलेले देशभरातील १६० विमानतळ पुन्हा सुरू करणार
• सार्वजनिक वाहतुकीमध्ये जुने परमिट मोडीत काढणार
• रस्ते आणि महामार्गासाठी ५५ हजार कोटी

कृषीक्षेत्रासाठी तरतूदी
farmer• ग्रामीण विकासासाठी एकूण ८,७७,६६५ कोटींची तरतूद
• शेतकऱ्यांसाठी नऊ लाख कोटींचे कर्ज
• खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
• सर्वच सेवांवर ०.५ टक्के कृषी कल्याण अधिभार लागू

जनसामान्यांसाठी
12314991 cms 1361685637 540x540• ६.८७ कोटी घरांमध्ये डिजिटल शिक्षण पोहोचवणार
• उच्च शिक्षणाकरिता १,००० कोटी रुपयांची तरतूद
• आयकर मर्यादेत कोणताही बदल नाही, लहान करदात्यांकडे विशेष लक्ष

• पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या करसवलतीत ३००० रुपयांची वाढ
• छोटय़ा पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजी वाहनांवर १ टक्के प्रदूषण अधिभार
• प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपयांचे विमा संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना १ लाख ४० हजारांचा विमा
• पंतप्रधान जनऔषधी योजनेअंतर्गत तीन हजार जेनरिक औषध दुकाने सुरू करणार

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division