‘मॅक्सेल’२०१५ सर्जनशील उद्योजकतेचा गौरव

महाराष्ट्र उद्योगधंद्यात मागे नाही. पण आपल्या यशस्वी उद्योगांचे ‘मार्केटिंग’ करण्यात आपण मागे पडतो. आपण उद्यमशीलतेतही कमी पडत नाही, आपण त्या उद्यमशीलेचे जागतिक वा राष्ट्रीय उद्योजकतेत रुपांतर करीत नाही. त्याचप्रमाणे आपण तंत्रज्ञानातही खूप प्रगती केली आहे, पण ते ज्ञान आपण उद्योगांना जोडू शकलेलो नाही.

‘आय टी’ असो वा ‘हॉर्टिकल्चर’, ‘ऑटोकल्चर’ असो वा ‘आर्किटेक्चर’ - आपण त्यात उत्तुंग यश प्राप्त केले आहे. या सर्व ज्ञानाला आणि विज्ञानाला साहस आणि सर्जनशीलतेची जोड मिळाली तर आपण देशातील सर्वात अव्वल राज्य म्हणून ओळखले जाऊ. आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेला उद्यमशीलतेशी जोडले तर महाराष्ट्र एक नवीन दृष्टीकोन देशाला देऊ शकेल हाच यंदाच्या ‘मॅक्सेल’ पुरस्कारांच्या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू होता. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई त्याचप्रमाणे विख्यात वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर आणि ‘मॅक्सेल’चे प्रणेते नीतिन पोतदार यांनी अनेक उदाहरणांनी हा विचार या अनोख्या कार्यक्रमात मांडला.

शिक्षणमंत्री तावडे यांनी नीतिन पोतदार यांच्या सूचनेचा संपूर्ण स्वीकार करून शाळा-महाविद्यालयांमध्ये सिलॅबसच्या स्तरावर उद्यमशीलता आणि व्यावसायिकता आणणार अशी घोषणाही केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योगसंस्कृतीला सामाजिक-शैक्षणिक आकार देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी ‘इनोव्हेशन’ म्हणजेच ‘सर्जनशील संकल्पना’ प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजकांनी केवळ उपक्रम-भांडवल नव्हे तर साहसीवृत्तीही जोपासण्याची गरज आहे हे सांगितले. ‘इनोव्हेशन’ आणि ‘अॅडव्हेन्चर कॅपिटल’ यांना एकत्र जोडण्याची वेळ आली आहे हे त्यांनी आश्वासकपणे मांडले.

डॉ. माशेलकर यांनी मांडलेल्या ‘जुगाड’च्या मुद्द्यावर बोलताना जेष्ठ पत्रकार कुमार केतकर म्हणाले की भारतात कित्येकदा ‘जुगाड’लाच इनोव्हेशनचा दर्जा मिळतो कारण अनेक तांत्रिक गोष्टींमध्ये सुधारणा, परिणामकारक बदल आणि उपयोग अस्स्ल भारतीय सर्जनशील जुगाडामधुनच होतो. जो दिखता है वही बिकता है... हे सूत्र मराठी तरुण उद्योजकांनी लक्षात ठेवले पाहिजे. असे सांगतानाच अॅड गुरू भरत दाभोळकर म्हणाले की उद्योजकांनी स्वत:चे ब्रँडिंग करावे आपल्या उत्पादनाचे वेगळेपण जपण्यासाठी कल्पकतेची जोड असावी आणि म्हणूनच आज ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची गरज आहे. भरत दाभोळकर यांच्या मार्गदर्शनपर भाषणाला उपस्थितांनी मनमुराद दाद दिली. यशस्वी जाहिरातपटू, प्रयोगशील नाटककार, कलासंयोजक आणि मार्केटिंग एक्स्पर्ट असणार्‍या दाभोळकरांनी सुमारे एक हजार प्रेक्षकांना मनोरंजनाच्या माध्यमातून ब्रॅन्डिगविषयी उत्तम धडे दिले. या वर्षापासून ‘यंग आंतरप्रिनियर पुरस्कार’ सुरू केला आहे. तर पुढच्या वर्षापासून ‘स्टार्ट अप्स’ पुरस्कार देण्याचे ठरवले आहे असे मॅक्सेल फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त नितीन पोतदार यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मॅक्सेलच्या या चळवळीतून नवीन उद्योजक तयार व्हावेत म्हणून यावर्षापासून ‘मॅक्सप्लोअर’ ही अभिनव संकल्पना मुंबईतील तीस महाविद्यालयात राबवण्यात आली. यामध्ये सुमारे १२०० विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधला असता प्रत्येक तरुणास नवीन उद्योग करण्याची इच्छा दिसून आली. हा फक्त एक पुरस्कार सोहळा राहिला नसून एक चळवळ झाली आहे असे ते म्हणाले. मराठी तरुणवर्ग उद्योगाकडे वळावा यासाठी आम्ही गेली काही वर्षे विचार केला असता याची पाळेमुळे आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आम्हाला आढळली. म्हणून ‘आयडिआ ऑफ आंत्रप्रिनिअरशिप’ अशा स्वरूपाचा एखाद्या अभ्यासक्रम शालेय शिक्षणामध्ये सुरू करावा अशी विनंती मी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना करत आहे. यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत ‘मॅक्सेल फाऊंडेशन’ करण्यास तयार आहे. ‘मॅक्स्प्लोअर’च्या माध्यमातून या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे आम्ही ठरविले आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’ या घोषणेप्रमाणे ‘मेक इन महाराष्ट्र’ आपण करू शकतो. यासाठी ‘नॉलेज बेस्ड आंत्रप्रिनिअरशिप’असा एखादा विषय शालेय शिक्षणात असल्यास कल्पक विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, आयटीआयच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात असलेल्या कारखाने, कंपन्यांशी संपर्क साधून ‘इंटर्नशिप’ची सोय करून दिल्यास त्याचा फायदा दोघांनाही होईल.

येत्या दहा वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येकी एक हजार कुटूंबातुन फक्त एक तरुण नवीन उद्योजक तयार झाला तरीही साधारण २० हजार तरुण उद्योजक निर्माण होतील आणि त्यातुन किमान दहा लाख रोजगार निर्माण होवु शकतात असंही पोतदार म्हणाले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई या प्रसंगी बोलताना म्हणाले की आताचे युग ‘आय टी’चे आहे. परंतु ‘आयटी’ म्हणजे इंडियन टॅलेंट असे असावयास हवे. त्यासाठी इनोव्हेशनची जोड असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातील ‘आयटीआय’मधून नवीन कौशल्याचे मार्गदर्शन करणारे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यासाठी जर्मनीबरोबर करार करण्यात येणार आहेत. जर्मन उद्योगपतीदेखील भारताचा विचार नवीन उद्योगांसाठी नेहमीच करतात. कारण भारतामध्ये झालेला इंग्रजीचा प्रसार, उत्तम तांत्रिक शिक्षण, सशक्त अर्थव्यवस्था या गोष्टी त्यांच्यासाठी पूरक आहेत.

‘सिडबी’ या महाराष्ट्र शासनाच्या बँकेतर्फे ७५ कोटींचा निधी नवीन उद्योजकांसाठी बाजूला काढून ठेवला आहे. हा निधी लवकर २०० कोटीपर्यंत नेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उद्योजकांना १००% आर्थिक मदत शासन करणार असल्याचे सांगतानाच उद्योजकांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन सुभाष देसाई यांनी केले.

डॉ. माशेलकर यांनी ‘नेक्स्ट लेव्हल ऑफ इनोव्हेशन’ या विषयावर आपले विवेचन करताना नाविन्याची उर्मी, स्पर्धा, प्रगतीचा ध्यास आणि सर्वसमावेशकता यावर जोर दिला. युरोपियन युनियन या संस्थेनेसुद्धा इनोव्हेशनचा ध्यास घेतला असून त्यांनी स्वत:ला ‘इनोव्हेशन युनियन’ असे संबोधण्यास सुरूवात केली आहे. भारतामध्ये आता आपण ‘इमिटेशन’ न करता ‘इनोव्हेशन’ करण्यास सुरूवात केली पाहिजे. तंत्रज्ञानाचा खुल्या मनाने स्वागत करण्यास तयार व्हायला हवे. आपल्या मधील ‘जुगाड’ ही वृत्ती थांबवतानाच ‘अॅफॉर्डेबल एक्सलेन्स’चा ध्यास घेतला पाहिजे. आपण मंगळावर यान पाठविले हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. संगणकातील ‘आयसी’ म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किटचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले, भारत आणि चीन यांनी संयुक्तरित्या संपूर्ण जगाला पादाक्रांत केले पाहिजे. गेल्या तीन शतकात म्हणजेच १९व्या शतकात इंटरर्नल इंजिन, २०व्या शतकात इंटिग्रेटेड सर्किट तर २१व्या शतकात इंडिया आणि चीन यांचे राज्य आहे. मात्र यामध्ये इंडियाचा वाटा मोठा असावयास हवा अशी इच्छा प्रदर्शित केली.

भारताने ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’ची तसेच राज्याने ‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. भारतामध्ये सरस्वती आणि लक्ष्मीया दोघांचा संगम झाला तर भारत महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही असे डॉ. माशेलकर म्हणाले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण पद्धतीबद्दल आपले विचार मांडले. आताची शिक्षणपद्धती बदलून ती जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख तयार करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत असे सांगितले. ‘एज्युकेशनली क्वालीफाइड’ की ‘प्रोफेशनली क्वालिफाइड’ यावर आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ शासनावर आली आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रातील सर्वदूर असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी इ-लर्निंगचा वापर करणार आहोत. शिक्षण विभागाला जवळपास ४४ हजार कोटी मिळतात परंतु त्यातील ४० हजारकोटी रुपये फक्त पगारावर खर्च होतात. अर्थात हा खर्च नसून ही गुंतवणुकच आहे. येत्या पाच वर्षात आम्ही या गुंतवणूकीवरील परतावा २२% वरून ४०% वर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप

अशोक खाडे
कार्यकारी संचालक, दास ऑफशोअर इंजिनियरिंग लिमिटेड

भारताच्या उद्योगविश्वाच्या चरित्रातील एक अपार जिद्दीची आणि प्रेरक कहाणी आहे अशोक खाडे यांची. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीशी झुंज देत त्यांनी उद्योजकतेचं स्पप्न उराशी जपलं. प्रथम ड्राफ्ट्समनचं शिक्षण घेतलं आणि त्यात कौशल्य मिळवलं. त्यानंतर खाडे यांनी कधीच अपयश पहिलं नाही. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टलासुद्धा त्यांची खास दखल घ्यावी लागली त्यांनी स्थापना केलेली "दास ऑफशोअर इंजिनियरिंग लिमिटेड' ही कंपनी ऑफशोअर फॅब्रिकेशन मधली आज एक उत्तुंग कंपनी म्हणून विख्यात आहे.

अशोक खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा पुरस्कार माझे कुटुंबिय आणि ४००० कामगार, यांचा प्रतिनिधी म्हणून स्वीकारीत आहे तसेच हे पारितोषिक स्वीकारताना मला विदर्भातील शेतकरी, माझे गाव, शाळा, नेपाळमधील थापा आठवतोय असेही सांगितले. निराश परिस्थितीमध्ये 'गेले ते ओझे होते, राहिले ते माझे होते' असा विचार करून पुढे कामास लागा असा सल्ला त्यांनी उद्योजकांना दिला.

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – एक्सलन्स इन बिझिनेस लिडरशीप

Maxell 2015 2मिलिंद बर्वे
कार्यकारी संचालक, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी

"अॅसेट मॅनेजमेंट' या अत्यंत जोखिमेच्या विषयात दोन लक्ष्ये साधणारी अद्वितीय अशी मॅच्युएल फंड योजना मिलिंद बर्वे यांनी प्रत्यक्षात आणली. त्यानुसार गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीसाठी चांगला परतावाही मिळणार होता आणि फंडातून हजारो कॅन्सर रूग्णांना मदतही मिळणार होती. "एचडीएफसी'च्या माध्यमातून मांडली गेलेली ही योजना म्हणजे सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी आणि पिडित रूग्णाची अप्रत्यक्ष सेवा याचा आदर्श समजली जाते. त्यांची ही कामगिरी नुसती परोपकारी नाही तर ती नवा मार्ग घडविणारी, नवी भर घालणारी आहे.

गुंतवणूक प्रबोधनाकडे सामाजिक कार्य म्हणून बघावे आणि जास्तीत जास्त मराठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळावे असे मत मिलिंद बर्वे यांनी मांडले. वास्तविक मी संगणक क्षेत्राशी संबंधित होतो परंतु माझ्या संस्थेने माझ्यावर सोपविलेली ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दलचे समाधान त्यांनी हा पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केले.

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – इमर्जिंग एक्सलन्स

शिवानी सुधांशू दाणी
संचालक, मनीबी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर

सर्वसाधारण ज्या वयात मुले पदवी करण्यासाठी झुंजत असतात त्या वयात शिवानी दाणी या अग्रणी संस्थांतून अध्‍यापनाचे कार्य करीत होत्या. "इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट' आणि "मार्केट अॅनलिसीस'या विषयांवर त्यांचं प्रभूत्व होतं. अनेकानेक कठीण परीक्षांत त्यांनी गुणात्मक दर्जाचा इतिहास घडवला. "नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्यूरिटीज मॅनेजमेंट' मध्ये असतांना त्या केवळ हूशार विद्यार्थ्यांनीच होत्या असं नाही तर त्या खर्‍या अर्थाने एकमेवाद्वितीय होत्या. वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी त्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करणारे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रराक्रम हीत्यांच्यानावावर नोंदलागेला आहे.

 

 

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – एक्सलन्स इन इनोव्हेशन्स

मंगेश काळे
कार्यकारी संचालक, प्रिसिजन ऑटोमेशन अॅण्ड रोबोटिक्स इंडिया (पारी)

औद्योगिकीकरणानंतरची अनेक दशके सारे जग आपापल्या स्वयंचलित तांत्रिकगरजांच्यापूर्ततेसाठी पश्चिमेकडेपाहात होते. मात्रयाचकाळातपुण्यातील मंगेश काळेहातरूण मॅन्युफॅक्चरिंग, स्टोअरेजयाप्रक्रियांतमोलाचीआणिनिर्णायकभूमिका पार पाडूशकणारी स्वयंचलित यंत्रणाविक सितकरण्यातगुंतलेला होता. १९९१ मध्ये स्थापन झालेल्या "पारी' यात्यांच्याकंपनीने आपल्या स्थापने पासूनच ऑटोमेशन च्याक्षेत्रातसाऱ्यांचे लक्षआपल्या कडेवेधूनघेतले. "पारी'च्याग्राहकांच्यामते ऑटोमेशन सोल्युशन्स मुळेत्यां च्याकंपन्यांनी उत्पादक क्षमता लक्षणीयप्रमाणातवाढलीहोती.आजसंपूर्णजगात १५०० ठिकाणी मंगेश काळे यांच्या कंपनीने विकसित केलेली ऑटोमेशन आणि रोबोटिक इनस्टॉलेशन्स कार्यरत आहेत. पुणे शहराला ऑटोमेशन हब मध्ये रूपांतरीत करण्याचे श्रेय हीमंगेश काळे यांच्याकडेच जाते. इनोव्हेशन वरफोकसकेल्याबद्दल मॅक्सेलचे आभार मानताचमाझ्यासर्वस्पर्धकांचे आभार मानतोकारणत्यां च्यामुळेचसातत्याचेनावीन्याचा शोधघे तराहिलो. यापुरस्कारामुळे अपेक्षांचे ओझेवाढले असल्याचे मंगेश काळे यांनीम्हटले.

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – यंग आंत्रप्रेन्युअर

अक्षय वर्दे
संस्थापक संचालक ‘वर्देंची मोटरसायकल'

भारतातील विख्यात विमान कंपनीत उच्चाधिकारी असलेल्या अक्षयवर्देयांनीमोटरसायकलवरील प्रेमापोटीत्यानोकरीचाराजीनामादिलाआणिआपल्यामनातीलसंकल्पितनवीनमोटरसायकलप्रत्यक्ष आणण्यातस्वत:लापूर्णपणेझोकूनदिलं. बेधडकआणिकर्तृत्ववानव्यक्तिमत्वाच्या अक्षयवर्देत्यांच्यारूपानेभारतातएकसर्वश्रेष्ठदर्जाचामोटरसायकलचासंकल्पक, एकरचनाकारनिर्माणझाला. त्यांनीरोजच्यावापरातल्याबाइक्सचेरूपांतरएकास्वप्नवतक्षमतेच्यामशीनमध्येकेलं... ग्राहकांच्यागरजेनुसारसर्वांगसुंदरडिझाईनकरण्यातलंत्यांचंकर्तृत्वपाहूनत्यांच्याकामालामागणीवाढली. त्यांच्याग्राहकातडिस्ने, कॅनन, पोलिसवॉचेस, हॉटव्हील्सहेब्रॅन्डसआणिबॉलीवूडमधीलअक्षयकुमार, जॅकीश्रॉफ, अभिनयदेवयांचाप्रामुख्यानेसमावेशहोतो. अक्षयवर्देयांना "मुंबईआयआयटी' यासारख्याअनेकनामांकीतअभियांत्रिकीसंस्थांमध्येविद्यार्थ्यांनामार्गदर्शनकरण्यासाठीआमंत्रितकरण्यातयेते.

मॅक्सेल अवॉर्ड फॉर – सोशल आंत्रप्रेन्युअरशिप

डॉ. मेधा पुरव सामंत
संस्थापक अन्नपूर्णा परिवार

संवेदनशीलताआणिकरूणाहीसामाजिकबदलाचंएकसशक्तमाध्यमअसूशकतेयाचं उदाहरणम्हणजे डॉ. मेधा पुरव सामंतयांनीउभारलेलंआणिविस्तारलेलंकार्य! मुंबई आणि पुण्यातील झोपडपट्ट्यांत जगणाऱ्याशेकडोगरजवंतांच्याआयुष्यालानवाअर्थदेण्यासाठीसहाएनजीओजचीस्थापनाकरूनत्यांनी "अन्नपूर्णापरिवारा'चीस्थापनाकेली... मायक्रोफायनान्स, मायक्रो-इन्शुरन्स, कम्युनिटीबेस्डपेन्शनयोजना, नोकरीकरणार्यास्त्रियांसाठीवसतिगृहआणिस्त्री-शिक्षणासाठीआर्थिकमदतअसेअनेकउपक्रमराबवले.

मेधा पुरव सामंत पुरस्कार स्वीकारता नाम्हणाल्या, साम्यवादी विचारांच्या कुटुंबात वाढल्यामुळे तसेच मुंबईतील गिरणगाव त्यांची गरीबी अनुभवताना माझे मनस्वाभाविकपणेसंवेदनशीलझाले. कॉन्झव्हर्टिव्हबँकिंगमध्येकामकरीतअसतानाअसहाय्यगरीबविक्रेत्यास्त्रियांनाकर्जमिळतनसेयातूनचअन्नपूर्णाच्यामाध्यमातून ५० हजारबायकांनाकर्जदिले. आजत्याअत्यंतप्रामाणिकपणेत्याचीसव्याजपरतफेडकरीतआहेत. महिलांनीमहिलांसाठीचालविलेलाआरोग्यविमाआणिनिवृत्तीवेतनहीआमचीसमाजालादिलेलीदेणगीआहे. उद्योगधंद्यांनाकेवळनफावालाभएवढाचविचारकरूनचालणारनाही. आपल्यादेशातलीगरीबी, बेकारीआणिउपेक्षादूरकरण्यासाठीस्त्रियांनाव्यवसायातजोडूनघेतले, त्यांनास्वावलंबीकेलेतरऔद्योगिकतेलामाणुसकीचाचेहराचनव्हेतरसामाजिकताहीप्राप्तहोईल.

मॅक्सेल लाईफ टाईम अवॉंर्ड

अशोक कोरगांवकर
संस्थापक, संचालक भागीदार – आर्च ग्रुप कन्सल्टंट

अशोककोरगांवकरयांच्यादुबईऑफिसमध्येमध्यपूर्वेतील "गव्हर्नरहाऊस', वेस्टीनहॉटेल१आणि२ "एमिरेटसएअरलाइन्सहेडक्वार्टर्स', "ग्रीनलेक्सटावर्स'... आणिअसेअनेकगाजलेलेस्थापत्यनमुनेआकारालाआले. ज्यांच्या प्रतिभाशक्तीमुळे गल्फची आकाशरेषा अतिशय संपन्न झाली तेमुंबईतल्यासामान्यकुटुंबातजन्मलेलेकोरगावकरहेयश, प्रतिष्ठा, पैसा यांच्याशिखरावरविराजमानझालेतेबुद्धिमत्ताआणि कर्तृत्वाच्या जोरावर! अनेक वर्षं बहारीन मधल्या कंपनी तकाढल्यावरत्यांनीस्वत:चाव्यवसायसुरूकेलाआणिबघताबघतातेमध्यपूर्वेतील एक नामांकित स्थापत्य कारम्हणून प्रस्थापित झाले. "गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड'मध्येजगातील सर्वातउत्तुंगइमारतम्हणूनत्यांच्या "जे.डब्ल्यू.मॉरिएटबिल्डिंग'चागौरवपूर्णउल्लेखझाला आहे.

जीवनगौरवपुरस्कारानेसन्मानितझालेलेअशोककोरगांवकरम्हणालेकीज्यावरळीमध्येमीलहानाचामोठाझालोत्याचवरळीयेथीलनेहरूसेंटरमध्येहापुरस्कारमिळतोययाचामलाआनंदवाटतआहे. मलाजीवनगौरवदेऊनसन्मानितकेलेम्हणूनमीकाहीइतक्यातनिवृत्तहोणारनाहीतरदुप्पटजोमानेकामकरणारआहे. आजपर्यंतचेआपलेसगळेसहकारीभारतीयअसल्याचेत्यांनीमोठ्याअभिमानानेसांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division