सप्टेंबरपासून 'फ्लिपकार्ट'वरील खरेदी केवळ मोबाईलद्वारे शक्य

flipkart wp 1ऑनलाईन खरेदीसाठी सर्वाधिक पसंती असणारे 'फ्लिपकार्ट'चे संकेतस्थळ सप्टेंबर महिन्यापासून पूर्णत: बंद केले जाणार असून केवळ "मोबाईल अॅप्लिकेशन‘द्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

भारतामध्ये स्मार्ट फोन व मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे अॅप्सच्या माध्यमामधून आवश्‍यक वस्तुंची खरेदी करण्याच्याबदलत्या मानसिकतेवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.'फ्लिपकार्ट'च्या या अॅपमध्ये ग्राहकाचे स्थान, प्राधान्य आणि खरेदीचे प्रकार ध्यानी घेऊन त्यानुसार प्रयोगात्मक बदल करण्याची सोयही 'ई-टेलर्स'ना उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कंपनीकडे येणारे सुमारे ७५% ग्राहक याआधीच अॅप्सच्या माध्यमामधून येत आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division