काळ्या पैशाच्या मूल्यमापनाची नियमावली जाहीर

black moneyकाळ्या पैशाविरोधी लागू करण्यात आलेल्या नवीन कायद्यांतर्गत परदेशात असलेला काळा पैसा आणि मालमत्ता यांचे मूल्य ठरविण्यासाठी केंद्र सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

परदेशात असलेली स्थावर मालमत्ता, सोने आणि मौल्यवान रत्ने, पुरातत्त्व वस्तू संग्रह, चित्रे आणि नोंदणी नसलेल्या कंपन्यांतील समभाग व रोखे यांचे मूल्य बाजारभावानुसार ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. परदेशातील बॅंक खात्यात असलेल्या पैशाचे मूल्यमापन ते बॅंक खाते सुरू केल्यापासून त्यात ठेवण्यात आलेल्या एकूण पैशाएवढे करण्यात येणार आहे. काळ्या पैशाविरोधी कायद्यांतर्गत परदेशात ठेवण्यात आलेला काळा पैसा आणि मालमत्ता यांच्यावर कर व दंड मिळून एकूण १२० टक्के आकारण्यात येणार आहेत.

परदेशातील संपत्तीची माहिती उघड करण्यास सरकारने नुकतीच ९० दिवसांसाठी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत माहिती उघड करणाऱ्यांवरील कायदेशीर कारवाई टळणार आहे. ही माहिती उघड करणार्‍या व्यक्तींना कर व दंड मिळून परदेशातील मालमत्तेच्या ६० टक्के भरावे लागणार आहेत. कर व दंड भरण्यासाठी त्यांना ३१ डिसेंबर २०१५ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. परदेशातील स्थावर मालमत्तेची किंमत ठरविताना तिच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त; तसेच चालू बाजारभावाचा विचार करून ठरविण्यात येणार आहे. हाच निकष सोने, चांदी, मौल्यवान रत्ने; तसेच पुरात्तत्व वस्तू संग्रह, चित्रे आणि शिल्प यांचे मूल्य ठरविताना विचारात घेण्यात येणार आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division