जुन्या नोटा बदलण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Currency Heroरिझर्व्ह बॅंकेने २००५पूर्वीच्या नोटा बदलून घेण्यासाठी आता सहा महिने मुदत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अशा नोटा असतील, त्यांना त्या ३१ डिसेंबर २०१५पर्यंत बॅंकांतून बदलून घेता येतील.

यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार ही मुदत जून अखेरीस संपत होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात २००५पूर्वीच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेने घेतला होता. अशा नोटा ओळखणे सोपे आहे. या नोटांच्या मागील बाजूस प्रिंटिंगचे वर्ष छापलेले नाही. २००५नंतरच्या नोटांवर मागील बाजूस प्रिंटिंगचे वर्ष छापलेले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division