दुर्बल घटकांना स्वस्त गृहकर्ज

shutterstock 77157886‘२०२२ पर्यंत सर्वांसाठी घर’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी पुढचे पाऊल म्हणून शहरी भागात गरिबांसाठी परवडणारी घरे बांधली जावीत, यासाठी गृहकर्जावरील व्याजदरात लक्षणीय सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

या संदर्भातील आंतरमंत्रालयीन समितीने व्याजदरात सवलतीची शिफारस केली होती. ही शिफारस मंत्रिमंडळाने मान्य केल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, झोपडपट्टीतील रहिवासी आणि अल्पउत्पन्न गटातील लाभार्थींना गृहकर्जावरील व्याजात साडेसहा टक्‍क्‍यांची सूट मिळू शकेल. या सवलतीमुळे संबंधित लाभार्थींचा गृहकर्जाचा मासिक हप्ता सुमारे २८०० रुपयांनी घटेल, असे सरकारचे म्हणणे आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, ही पूर्णपणे केंद्र पुरस्कृत योजना आहे. अर्थातच यात राज्यांचाही सहभाग असेल. यामुळे दुर्बल, वंचित घटकांना गृहकर्जावर केवळ चार टक्केच व्याज द्यावे लागेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division