'प्लॅनेट फॅशन'ची ३०० नवीन स्टोअर्स

Planet Fashionआदित्य बिर्ला समूहातील 'प्लॅनेट फॅशन'ने आगामी तीन वर्षांत ३०० नवीन दालने सुरू करण्याचे योजिले आहे.

सध्या देशभरात १७६ शहरांमध्ये २२५ दालनांसह प्लॅनेट फॅशन ही वस्त्रप्रावरणांची विक्रीशृंखला प्रसिद्ध आहे. प्लॅनेट फॅशनच्या आक्रमक विस्तार वाटचालीला नवीन बोधचिन्हासह नवी ओळखही प्रदान करण्यात आली आहे. या नव्या ब्रँड प्रतिमेचे अलीकडेच बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते समारंभपूर्वक अनावरण करण्यात आले. लुई फिलिप, व्हॅन ह्य़ूजेन आणि अ‍ॅलन सोली या ब्रँडची तयार वस्त्रे या दालनात उपलब्ध असतील.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division