'अस्पायर होम फायनान्स'ची महिला शाखा सुरू

db87f038 5337 4675 985d 192ea026c96a medium'मोतीलाल ओसवाल'ची गृहवित्त क्षेत्रातील उपकंपनी 'अस्पायर होम फायनान्स लि.'ने खास महिलांकरिता 'माला' या नावाने गृह कर्ज विभाग सुरू केला आहे. याची पहिली शाखा नायगाव येथे नुकतीच सुरू झाली.

किफायतशीर घरांच्या खरेदी अथवा बांधणीसाठी निम्न उत्पन्न गटातील नोकरदार तसेच स्वयंरोजगार मिळविणार्‍या महिलांना गृहकर्ज साहाय्य आणि सल्ला या शाखेतून पुरविला जाणार आहे. 'माला' खाजगी कंपन्या, लघुउद्योगात अथवा अगदी घरकाम करणार्‍या, फेरीवाल्या, फळ-भाजी विक्रेत्या, शिवणकाम, उदबत्ती बनविणे, पापड बनविणे, तयार कपडे बनविणे, स्वयंपाकाची कामे करणे, विणकाम, धुलाई, शिकवणी, लग्नाची कंत्राटे याद्वारे स्वयंरोजगार मिळविणार्‍या महिलांना दोन लाख ते १२ लाखांपर्यंतचे गृह कर्ज देणार आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे टप्प्याटप्प्याने 'माला'च्या अजून काही शाखा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे, असे तिचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल सच्चिदानंद यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division