'टोयोटा'कडून दरसाल १००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

7W3S45Aaउद्योगांच्या शिक्षणक्षेत्रातील सहभाग अधोरेखित करणार्‍या टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम (टी-टेप) अंतर्गत देशभरातील ४१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी (आयटीआय) सामंजस्य करीत टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. कंपनीकडून सध्या दरवर्षी १,००० हून अधिक विद्यार्थ्यांना वाहन उद्योगाशी निगडित विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.  

टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, तिचे विविध सुटे भाग पुरवठादार कंपन्या आणि देशभरातील टोयोटाचे अधिकृत विक्रेते यांनी भागीदार आयटीआयच्या माध्यमातून राबविलेल्या टी-टेपअंतर्गत मुंबईतील तिसर्‍या आयटीआयच्या सहभागाची घोषणा अलिकडेच करण्यात आली. २००६ साली कंपनीने टी-टेप उपक्रम सुरू केला आणि तेव्हापासून विविध राज्यांतील ४१ आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना यात सामावून घेण्यात आले आहे. मुंबईव्यतिरिक्त सातारा, कोल्हापूर, पुणे येथे टोयोटाने बॉडी अँड पेंट, सामान्य वाहन उद्योगातील दुरुस्तीचे १० वीनंतर एक वर्ष कालावधीचे प्रशिक्षणक्रम तर १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सेवा सल्लागार हा प्रगत अभ्यासक्रम राबविला जात आहे, अशी माहिती टोयोटा किलरेस्कर मोटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश एन. साळकर यांनी दिली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division