'आयडीएफसी'चा बँक स्थापनेचा मार्ग खुला

IDFCपायाभूत सेवा क्षेत्रासाठी वित्त पुरवठा करणार्‍या 'आयडीएफसी' लिमिटेडला बँक व्यवसाय सुरू करण्यासाठीचा अंतिम परवाना अखेर प्राप्त झाला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने याबाबत मंजूरी दिल्यानंतर बँकेचे प्रत्यक्ष कामगाज १ ऑक्टोबरपासून सुरू होईल. बँक २० शाखांच्या माध्यमातून या व्यवसायाला प्रारंभ करेल.

तिसर्‍या फळीतील नव्या बँकिंग परवान्यासाठी 'आयडीएफसी' लिमिटेड व 'बंधन फायनान्शिअल' या दोनच वित्तसंस्था पात्र ठरल्या होत्या. पैकी 'बंधन'ने २३ ऑगस्टपासून व्यवसायास प्रारंभ करण्याचे जाहीरही केले आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते बँकेच्या कोलकता येथील मुख्यालयी तिचा शुभारंभ होईल. बँकेच्या बोधचिन्हासह संचालक मंडळही पंधरवडय़ापूर्वीच जारी करण्यात आले.

प्राथमिक ५५,००० कोटी रुपयांच्या कर्ज तरतुदीबरोबरच , 'आयडीएफसी' बँक व्यवसायासाठी आतापर्यंत ६०० मनुष्यबळ जोडण्यात आल्याचे कळते.

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये २२ शाखांपासून बँकेच्या व्यवसायाची सुरुवात होण्याचीची चर्चा आहे. त्यात, मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोलकता, अहमदाबाद आदी शहरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मध्य भारतात शाखांचे जाळे अधिक असेल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division