सीकेपी बँकेवरील र्निबधात तीन महिन्यांनी वाढ

ckp bank logoसहकार क्षेत्रातील दी सीकेपी को - ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील र्निबध आणखी तीन महिन्यांसाठी विस्तारित करण्यात आले आहेत. बँकेवर सध्या प्रशासक नेमण्यात आले असून रक्कम काढण्यावर खातेदारांना मर्यादा घालण्यात आल्या आहेत. ३१ जुलै रोजी याबाबतची मर्यादा संपुष्टात येत असताना ती ३१ ऑक्टोबर २०१५ पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष श्रीधर खानोलकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येताच बँकेच्या र्निबधाबाबत कार्यवाही करण्याची मागणी खातेदारांकडून करण्यात आली होती. निवडक व्यक्तींमार्फत करण्यात आलेल्या अनियमिततेमुळे बँकेच्या हजारो खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांना दैनंदिन व्यवहार करणेही त्रासदायक ठरत असल्याचे खातेदारांचे म्हणणे आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division