ल्युपिनचा अमेरिकी कंपनीवर ताबा

841px The Lupin Logo.svgऔषध निर्मिती क्षेत्रातील ल्युपिनने अमेरिकेतील गॅविस ही कंपनी ८८ कोटी डॉलरना (५,६१० कोटी रुपये) खरेदी केली आहे. या व्यवहारामुळे ल्युपिनला अमेरिकेच्या औषध बाजारपेठेतील स्थान अधिक भक्कम करता येणार आहे. यामार्फत ल्युपिनला त्वचारोगावरील औषधनिर्मितीत शिरकाव करता आला आहे.

गॅविस फार्मास्युटिकल्स एलएलसी व नोव्हेल लॅबॉरेटरिज इन्क या दोन कंपन्या ल्युपिनने खरेदी केल्या. या दोन्ही कंपन्यांवर कोणतेही कर्ज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. खरेदी-विक्री करणार्‍या उभय कंपन्यांच्या संचालक मंडळांनी या व्यवहाराला मान्यता दिल्याचे ल्युपिनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विनिता गुप्ता यांनी जाहीर केले.

गॅविसचे अमेरिकेत संशोधन व विकास केंद्र आहे. कंपनीच्या न्यूजर्सी येथील निर्मिती प्रकल्पावर ताबा मिळाल्याने ल्युपिनचे आता अमेरिकेत पहिले उत्पादन निर्मिती केंद्र असेल. गॅविसने गेल्या आर्थिक वर्षांत ९.६० कोटी डॉलरची विक्री नोंदविली आहे. कंपनीत २५० कर्मचारी आहेत. ६६ नव्या औषधांसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मंजुरी प्रतीक्षेत आहे. तर तितकीच औषधे निर्मितीच्या टप्प्यावर आहेत.

गॅविसच्या खरेदीनंतर ल्युपिनची औषध संख्या १००च्या वर जाईल. ल्युपिनने याच महिन्याच्या सुरुवातीला रशियातील बायोकॉम खरेदी केली. मेडक्युमिका इंडस्ट्रिया फार्मास्युटिकाद्वारे ल्युपिनने ब्राझीलमध्येही शिरकाव केला होता.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division