सलग नवव्यांदा मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय

mukesh ambaniरिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग नवव्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत नागरिक होण्याचा मान मिळविला आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण १८.९ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी संपत्ती आहे. फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. या यादीत दुसर्‍या स्थानावर सन फार्माचे संस्थापक दिलीप संघवी आहेत. त्यांच्याकडे १८ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी १५.९ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसर्‍या स्थानावर आहेत.

यंदाच्या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन व बिन्नी बन्सल यांना प्रथमच भारतातील आघाडीच्या १०० श्रीमंत उद्योजकांच्या यादीत सामील होण्याचा मान मिळाला आहे. या दोघांकडे प्रत्येकी १.३ अब्ज डॉलर संपत्ती असून त्यांना या यादीत ८६ व्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

देशातील सर्व उद्योजकांची एकत्रितपणे ३४५ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. वर्ष २०१४ मध्ये हा आकडा ३४६ अब्ज डॉलर होता. यावर्षी भारताचा विकास दर सात टक्क्यांनी वाढणे अपेक्षित होते, परंतु उद्योगपतींच्या संपत्तीतील घसरणीचे प्रमुख कारण शेअर बाजारातील मोठी घसरण व रूपयातील अस्थिरता असल्याचे फोर्ब्सकडून सांगण्यात आले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division