‘ओएनजीसी विदेश’ची रशियातील तेलक्षेत्रात हिस्सेदारी

ONGC Videsh stतेल व वायू क्षेत्रातील ‘ओएनजीसी’ने रशियातील व्हॅन्कोर तेलक्षेत्रात कार्यरत "व्हॅनकोरनेफ्ट' या कंपनीचे १५ टक्के भांडवली समभाग १.२६८ अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात ताब्यात घेतले. "ओएनजीसी विदेश लिमिटेड' (ओव्हीएल) या उपकंपनीमार्फत विदेशात केलेला हा चौथा संपादन व्यवहार आहे.

रशियातील सैबेरिया क्षेत्रात क्रॅस्नोयाक प्रदेशातील तुरुखान्स्की जिल्ह्यात व्हॅन्कोर हे तेलक्षेत्र आहे. रशियातील दुसरा मोठा तेलसाठा असलेले या क्षेत्राचे त्या देशाच्या एकूण तेल उत्पादनांत त्याचे ४ टक्के योगदान आहे. येथून दिवसाला ४.४२ लाख पिंप म्हणजे दरसाल अडीच अब्ज पिंपे तेल मिळविता येईल आणि त्यापैकी ३३ लाख टन उत्पादित तेल "ओएनजीसी विदेश'ला प्रतिवर्षी प्राप्त होऊ शकेल. "सीएसजेसी व्हॅन्कोरनेफ्ट' या कंपनीत ओव्हीएलने १५ टक्के समभागांचा करार केला आहे.

व्हॅन्कोरनेफ्टमध्ये रशियन सरकारच्या मालकीचे रॉसनेफ्टचे १०० टक्के भागभांडवल आजवर होते. ओएनजीसी विदेशबरोबर झालेल्या १५ टक्के भाग हस्तांतरण कराराची अंमलबजावणी पूर्तता २०१६च्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. ओएनजीसी विदेश अथवा रोसनेफ्टने या व्यवहाराचे मूल्य अधिकृतपणे सांगितले नसले तरी त्यासाठी १.२६८ अब्ज डॉलर्स मोजले गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division