सर्वंकष विकासात भारत ३८ व्या स्थानावर

world economic fourumव्यवसाय करण्याचे वातावरण आणि राजकीय नीतिमूल्ये या गोष्टी अन्य देशांच्या तुलनेत भारत चांगल्या स्थानावर असताना सर्वंकष वाढ आणि विकास यात मात्र, भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूप मागे पडल्याचे चित्र आहे. "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम‘ने (डब्ल्यूईएफ) जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार भारताचा क्रमांक कनिष्ठ मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात 38 व्या स्थानावर आहे.

"डब्ल्यूईएफ‘ने प्रथमच अशा प्रकारची पाहणी करून क्रमवारी जाहीर केली आहे. दरडोई उत्पन्नाचा विचार करून आर्थिक असमानता दूर करण्यासाठी योग्य पावले न उचलणार्‍या देशांची पाहणी करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ही पाहणी मागील दोन वर्षांत करण्यात आली आहे. राजकीय धोरणकर्ते आर्थिक विकास आणि समानतेसाठी कोणते मार्ग अवलंबत आहेत आणि या मार्गांचे यशस्वी होण्याचे प्रमाण व परिणाम यांचा अभ्यास करण्यात आला. यात भारत कनिष्ठ मध्यम वर्ग गटातील देशांत ३८ व्या स्थानावर आहे. वित्तीय व्यवहारांच्या तुलनेतही भारताचे स्थान निराशाजनक असून, ३८ देशांत भारत ३७ व्या स्थानावर आहे. करप्रणालीबाबत भारत ३२ व्या, तर सामाजिक सुरक्षेच्या मुद्‌द्‌यावर ३६व्या स्थानावर आहे. भारतीय राज्यकर्त्यांनी स्वयंरोजगाराला प्राधान्याने प्रोत्साहन देण्याची तातडीने गरज आहे. लघुउद्योग क्षेत्रातील मालकीच्या क्षेत्रातही भारताची कामगिरी नीचांकी असून, तो ३८व्या स्थानावर आहे, असे "डब्ल्यूईएफ‘ने म्हटले आहे.

"डब्ल्यूईएफ‘ने काही आशादायक स्थितीही भारताबाबत मांडली आहे. भ्रष्टाचार आणि भाडेपट्टा यात भारताचे स्थान चांगले असून, यात देश आठव्या स्थानावर आहे. राजकीय नीतिमूल्यांच्या बाबतीत भारत बाराव्या स्थानावर आहे. "डब्ल्यूईएफ‘ने म्हटले आहे की, ही सर्वंकष वाढ आणि विकासाची क्रमवारी जगभरातील देशांना त्यांच्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिशादर्शक ठरेल. आर्थिक विकासात सर्व सामाजिक घटकांना सहभागी करून घेण्याचे आव्हान जगातील देशांसमोर आहे. या क्रमवारीसाठी जगभरातील ११२ देशांची पाहणी करण्यात आली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division