उद्योगांचा सीएसआर निधी पाच निवडक क्षेत्रांत खर्च होणार

School 621x414‘कंपन्यांचा सीएसआर निधी नियोजनबद्ध रीतीने निवडक क्षेत्रांत खर्च व्हावा, त्यातून त्या क्षेत्रात परिणामकारक बदल साधता यावेत, असे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. अर्थ विभागाने त्यासाठी अंगणवाड्यांचा विकास, जलयुक्त शिवार योजना, महिलांचे स्वयंरोजगार प्रशिक्षण, वृक्ष लागवड मोहीम, शालेय शिक्षण या पाच क्षेत्रांची निवड केली असून, अर्थ विभाग कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करणार आहे.

राज्य सरकार निवडक क्षेत्रांच्या विकासासाठी कार्पोरेट्सच्या सीएसआर निधीची मदत घेणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी एप्रिलमध्ये केली होती. मात्र, त्यावर अंमलबजावणीस विलंब झाला. अर्थ विभागाने दोन कोटींहून अधिक सीएसआर निधीची (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी) तरतूद असलेल्या राज्यातील कंपन्यांची यादी तयार करण्याची जबाबदारी केपीएमजी या सल्लागार कंपनीला दिली. या कंपन्यांमध्ये खासगीच नाही तर वेस्टर्न कोल फिल्ड्ससारख्या सरकारी उपक्रम कंपन्यांचाही समावेश असेल. सीएसआर निधी निधी कंपन्यांनी या पाच क्षेत्रात खर्च करायचा की त्यासाठी संस्था स्थापन करायची याचा निर्णय होणार आहे. सीएसआर निधीची रक्कम एक हजार कोटींपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. दुष्काळी परिस्थिती पाहता जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्याचे शासनाचे नियोजन आहे. सीएसआर निधीचा त्यासाठी फायदा व्हावा, अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division