अ‍ॅलिकॉन समूहाकडून आणखी एक संपादन व्यवहार

AliconLogoपुणेस्थित अ‍ॅलिकॉन समूहातील मुख्य कंपनी आणि विविध उद्योगांसाठी अ‍ॅल्युमिनियम मिश्रधातू साच्यांची (कास्टिंग्ज) निर्मिती करणार्‍या एलिकॉन कास्टअलॉय लि. ने येथील अ‍ॅटलास कास्टअलॉय लि.च्या कास्टिंग्ज व्यवसाय संपूर्ण प्रकल्प व यंत्रसामग्रीसह संपादित केल्याची नुकतीच घोषणा केली.

अ‍ॅटलासच्या सर्व भागधारकांना एलिकॉनचे १२.५५ लाख भांडवली समभाग वितरीत करून ही संपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अ‍ॅटलासचा प्रति वर्ष ६,००० मेट्रिक टन क्षमतेचा अ‍ॅल्युमिनियम साच्यांचा प्रकल्प चिंचवड येथे असून, कंपनीने त्यायोगे आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये १३७ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली, अशी माहिती एलिकॉन समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी विमल गुप्ता यांनी दिली. या ताबा व्यवहारातून ग्रीव्हज् कॉटन, रॉयल एनफिल्ड, पिआज्जियो आणि संरक्षण क्षेत्रासारखा अ‍ॅटलास ग्राहकवर्गही एलिकॉनकडे वळेल, अशी त्यांना आशा आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division