"विको लेबॉरेटरिज"ला पुरस्कार

vico labsमुंबईस्थित ‘पेटा’ या संस्थेकडून "विको लेबॉरेटरिज'ला त्यांच्या आयुर्वेदिक उत्पादनांकरिता नुकताच ‘कॉम्पॅशनेट बिझनेस’ हा पुरस्कार देण्यात आला आहे. याप्रसंगी विको लेबॉरेटरिजचे संचालक संजीव पेंढारकर म्हणाले, आमचे ग्राहक हे उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी अतिशय जागरूक आहेत आणि म्हणूनच आम्हीसुद्धा आमच्या उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी तेवढेच जागरूक आहोत.

‘पेटा’ या संस्थेच्या अधिकार्‍यांद्वारे उत्पादनांचे सखोल परीक्षण केल्यानंतर विको लेबॉरेटरिजला हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार दोन वर्षांच्या अवधीकरिता ग्राह्य धरला जाईल. हा पुरस्कार मिळणे हाच आमच्याकरिता मोठा सन्मान असल्याचे पेंढारकर म्हणाले. मुंबई येथे ‘पेटा’ ही संस्था कार्यरत आहे. मुक्या प्राण्यांप्रति अनुकंपा बाळगून त्यांना संवेदनात्मक वागणूक मिळवून देणार्‍या लोकांची ही संस्था आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division