"मारुती सुझुकी"तर्फे लवकरच ‘एलसीव्ही’ बाजारात

2014SuzukiCarryfrontमारुती सुझुकी इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षांत लाइट कमर्शियल व्हेईकल-एलसीव्ही बाजारात सादर करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे या वाहनांच्या मागणीत घट होत असतानाही कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक आर.एस. कालसी यांनी सांगितले की, सुरुवातीला काही राज्यात व नंतर देशात या वाहनाची विक्री केली जाईल. एलसीव्ही वाहनांची स्थानिक बाजारपेठ कमी होत चालली असताना इतर व्यावसायिक वाहनांची बाजारपेठ थोडी वाढली आहे. मारूती उद्योगाने या वाहनाच्या निर्मितीसाठी वेगळी यंत्रणा वापरण्याचे ठरवले आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीबाबत कालसी यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षांत आम्ही दीड लाख खेड्यात गाड्या विक्रीस उपलब्ध करून देणार आहोत, गेल्या वर्षी सव्वा लाख खेड्यात विक्री करण्यात आली होती. मागणी कमी होत असल्याने आता ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सध्या कंपनीच्या गाड्यांची एक तृतीयांश विक्री ग्रामीण भागात होत आहे. कंपनी यंदाच्या वर्षी दोन अंकी वाढीचा दर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. पहिल्यांदाच मोटार घेणार्‍यांचे प्रमाण या वर्षांत ४४ टक्के आहे ते गेल्या वर्षी ते ३७ टक्के होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division