'सोशल टुरिझम'ला पर्यटकांची वाढती पसंती

10945870134c7b2129a83e4आनंदवन, हेमलकसा, हणसर वाडा यांसारख्या सामाजिक प्रकल्पांना सोशल टूर्सद्वारे भेट देऊन तेथील सामाजिक परिस्थिती जाणून घेणार्‍या पर्यटकांची संख्या सध्या वाढू लागली आहे. पर्यटनाबरोबरच सामाजिक प्रकल्पांसाठी सोशल टूर्स हा प्रगतीचा आणि सेवाभावाचा नवा अध्याय ठरत आहे.

समुद्र किनारे आणि थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच राज्यात आनंदवन, हेमलकसा, मेळघाट, लातूरमधील हणसर वाडा यांसारखे सामाजिक प्रकल्प "सोशल टुरिझम‘मुळे पर्यटनाची नवी केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. प्रसार माध्यमांमध्ये या प्रकल्पांमधील समस्यांबाबत झालेल्या चर्चा आणि डॉ. प्रकाश आमटे यांच्या सामाजिक कार्यावर आधारित प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे पर्यटकांमध्ये या प्रकल्पांविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.

anandwan

"आनंदवन‘ आणि "हेमलकसा‘ला भेट देणार्‍यांची संख्या वाढते आहे. गेल्या दोन वर्षांत "सोशल टुरिझम‘द्वारे पाच हजारांहून अधिक पर्यटकांनी आनंदवन आणि हेमलकसा या दोन प्रकल्पांना भेटी दिल्या आहेत. मेळघाटातील डॉ. रवी आणि डॉ. स्मिता कोल्हे यांचा प्रकल्प तसेच लातूरमध्ये भटक्‍या-विमुक्त जमातींसाठी कार्य करणार्‍या नरसिंग झरे यांच्या हणसर वाडा येथील प्रकल्पाला जाणार्‍या पर्यटकांचे प्रमाणही वाढत चालले आहे. ज्येष्ठांबरोबरच तरुणाई या सामाजिक सहलींमध्ये सहभागी होताना दिसते आहे.

deerज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी (जि. नगर) आणि पोपटराव पवार यांचे हिवरेबाजार ही दोन आदर्श गावेही सोशल टूर्स ऑपरेटर्सची प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. सहलीतून प्रकल्पातील समस्यांचा पर्यटकांना अनुभव घेता येतो. ज्यातून ते त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीमध्ये प्रकल्पाविषयी जनजागृती करतात. अनेकदा पर्यटकांकडून या प्रकल्पांना मदत केली जाते, तर काही पर्यटक या प्रकल्पांशी स्वयंसेवक म्हणून स्वत:ला जोडून घेतात. त्यामुळे "सोशल टुरिझम‘मधून या सामाजिक प्रकल्पांना हातभारदेखील लागतो आहे. ‘सोशल टुरिझम‘मधील विकासाच्या संधी लक्षात घेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानेही "सोशल टुर्स‘वर भर दिला आहे. मात्र ज्या ठिकाणी हे सामाजिक प्रकल्प आहेत, अशा गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पर्यटकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्‍वास सोशल टूर ऑपरेटर्सकडून व्यक्त होत आहे.

.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division