खुल्या बाजारातून विजेची खरेदी यावर सीएमआयएद्वारे चर्चासत्र संपन्न

CMIAखुल्या बाजारातून वीज खरेदीचा पुनर्विचार उद्योगक्षेत्रात होतो आहे. याबाबतीत उपलब्ध पर्याय आणि प्रक्रिया याबाबत अधिक माहिती देण्यासाठी सीएमआयएचा ऊर्जा सेल आणि मे. मणिकरण पॉवर लि. यांनी संयुक्तपणे ‘ओपन अ‍ॅक्सेस पॉवर परचेस पॉलिसी’ याविषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यात भारतीय ऊर्जा क्षेत्राची सद्यःस्थिती, ओपन अ‍ॅक्सेस इन इलेक्स्ट्रिसीटी अ‍ॅक्ट २००३, ऊर्जा व्यापार - पुनरावलोकन, बायलॅटरल पॉवर ट्रेडिंग - पुनर्विलोकन, महाराष्ट्र राज्यातील ऊर्जा स्थितीचे वर्तमान चित्र, महाराष्ट्र ओपन अ‍ॅक्सेस पॉलिसी, नूतनशील ऊर्जा, ओपन अ‍ॅक्सेस केस स्टडी इत्यादी विषयांवर तज्ज्ञांद्वारे चर्चा व मार्गदर्शन केले गेले याबरोबरच ओपन अ‍ॅक्सेस युजर्स असोसिएशन आणि खाजगी ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सनएडिसनचे प्रतिनिधी विस्वनाथन श्रिणी, बिजनेस डेव्हलपमेंट हेड उपस्थित होते.

सी.एम.आय.ए. एनर्जी सेल तर्फे उर्जाविषयक विविध विषयावर चर्चा सत्रांचे तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात येते आत्तापर्यंत फक्त एम.एस.ई.डी.सी.एल. कडून पॉवर घेण्यात येत होती परंतु नविन कायद्या प्रमाणे खुल्या बाजारातून ती विकत घेता येऊ शकते व त्याचा वापर करता येऊ शकतो.

या चर्चासत्रादरम्यान राज्यातील तसेच देशातील विजनिर्मिती व वापर यांचा तपशील सादर करण्यात आला तसेच उद्योग हे स्वत:साठी वीज विकत घेऊ शकतात व त्यासाठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते याबद्दल माहिती देण्यात आली. खुल्या बाजारातून वीज खरेदीचे धोरण ग्राहकाच्या हिताचे असल्याचे मत चर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी व्यक्त केले.

या चर्चासत्रास मणिकरण पॉवरचे नवजित कलसी, मॅनेजिंग डायरेक्टर, मणिकरण पॉवर लिमिटेड प्रवीण अब्राहम, डायरेक्टर, मनिष शर्मा, असिस्टंट जनरल मॅनेजर, प्रतीनिधी उपस्थित होते. मणिकरन पॉवरचे प्रवीण यांनी उपस्थितांना पॉवर पॉइंटच्या माध्यमातून या विषयावर माहिती दिली.

सनएडिसनतर्फे विस्वनाथन श्रिणी, बिज़नेस डेव्हलप्मेंट हेड यांनी सोलार पॉवर प्लॅंट मधून स्वस्तात वीज कशी मिळू शकते याबद्दल सविस्तर माहिती दिली. मेटारोल चे डी.बी. सोनी व व्हेरॉकचे सुरश क्षिरसागर यांनी केस स्टडी सादर केली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division