ऐन दिवाळीत तीन सुवर्ण योजनांचा शुभारंभ

narendra modi gold759पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सुवर्ण रोखे, सुवर्ण ठेव आणि सोन्याची नाणी अश्या तीन योजनांचे शुभारंभ केला. प्रत्यक्ष सोने खरेदीला उपाय म्हणून सुवर्ण रोखे योजना तर देशातील घराघरांमध्ये पडून राहिलेला सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी ‘सुवर्ण ठेव‘ योजना सादर करण्यात आली आहे. त्यासोबतच सरकारने अशोक चक्राचे चिन्ह असलेली नाणी सादर केली आहेत. लवकरच ही नाणी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या सुवर्ण योजना देशातील नागरिकांना फायदेशीर ठरतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला.

देशात दरवर्षी 1000 टन सोन्याची आयात केली जाते. तेलानंतर सोने आयात करण्यात येणार दुसरा सर्वात मोठा घटक आहे. त्यामुळे आयात बिल मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. सोन्याच्या आयातीमुळे 2013 मध्ये भारताची वित्तीय तूट 190 अब्ज डॉलर या उच्चांकी पातळीला पोचली होती. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने या महत्त्वाकांशी योजनेला सुरूवात केली आहे.

सुवर्ण रोखे योजना:
प्रत्यक्ष सोने खरेदीला पर्याय म्हणून सरकारने आता सुवर्ण रोखे योजना सादर केली आहे. हे सुवर्ण रोखे येत्या 5 ते 20 नोव्हेंबरदरम्यान प्रति ग्रॅम 2,684 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरकारतर्फे हे बॉंड्‌स आणले जाणार असून, यावर ग्राहकांना 2.75 टक्के व्याज मिळणार आहे. हे रोखे 26 नोव्हेंबरला ग्राहकांना हस्तांतरित करण्यात येतील. बॅंका आणि टपाल खात्याच्या ठराविक कार्यालयात रोखे विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत.

रोख्यांची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून गुंतवणूकदारांना बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आधीच्या आठवड्यातील सोन्याच्या सरासरी बाजारभावानुसार या रोख्यांची किंमत ठरविली जाणार आहे. तसेच, या रोख्यांची विक्री करतानादेखील याचप्रकारे किंमत निश्चिंत केली जाणार आहे. सोन्याच्या बॉंडवरील व्याज करपात्र असणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने नमूद केले आहे.

सुवर्ण ठेव योजना:
सुवर्ण ठेव योजनेमुळे बँकेत सोने ठेवल्यानंतर त्यावर व्याज मिळणार आहे. देशातील सोन्याची मागणी आणि आयात आटोक्यात आणण्यासाठी ही योजना सादर करण्यात आली आहे. देशातील नागरिकांकडे विविध संस्थांकडे सुमारे 60 लाख कोटी रुपये मूल्याचा सोन्याचा साठा पडून आहे. हा साठा चलनात आणण्यासाठी सरकारने "सुवर्ण ठेव योजना‘ आणली आहे.

सोन्याची नाणी:
या योजनेअंतर्गत अशोक चक्र व महात्मा गांधींची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी विक्री करण्यात येणार आहेत. सुरूवातील 5 ते 10 ग्रॅम वजनाची सोन्याची नाणी उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर 20 ग्रॅम वजनाचे नाणेदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. एमएमटीसीमार्फत पाच ग्रॅमची 15,000 नाणी, 10 ग्रॅमची 20,000 नाणी कर 20 ग्रॅमची 3,750 नाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division