मेस्सी टाटा मोटर्सचा जागतिक ब्रॅंड अॅम्बेसेडर

lionel messi tata motors mचार वेळा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान मिळवणारा अर्जेटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची टाटा मोटर्सचा जागतिक ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
टाटा मोटर्सने कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या प्रसिद्धीसाठी मेस्सीची निवड केली आहे. जागतिक कीर्तीचा फुटबॉलपटू असलेला मेस्सी प्रथमच एका भारतीय ब्रॅंडची जाहिरात करणार आहे. तरुणांना उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा मुख्य उद्देश आहे. फुटबॉल आणि मेस्सी यांचा तरुणांशी फारच जवळचा संबंध असल्याने हा निर्णय घेतल्याचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी सांगितले. टाटा मोटर्सने मेस्सीसोबत दोन वर्षे मुदतीचा करार केला असून त्याच्या कालावधीत वाढ होण्याची शक्याता आहे. लिओनेल मेस्सीच्या जगभरातील लोकप्रियतेचा कंपनीच्या उत्पादनांना निश्चिात फायदा होईल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division