ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सवलतींचे युद्ध

The Great Indian E commerce Warदिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या सज्ज झाल्या आहेत. जास्तीत जास्त उत्पादनांवर सर्वाधिक डिस्काउंट देण्याचा दावा करत फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन या आघाडीच्या कंपन्या एकमेकांना जबरदस्त टक्कर देत उभ्या आहेत.

स्मार्टफोनधारक ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने काही विशिष्ट अॅपवर सेल ठेवला आहे. दसरा-दिवाळीमध्ये विक्रीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून या काळात सवलत योजना जाहीर केल्या जातात. एकूण विक्रीच्या सरासरी 25 ते 30 टक्के विक्री या काळात होत असल्याचे गेल्या दोन वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विक्री करण्यावर या कंपन्यांचा भर आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फ्लिपकार्ट, स्नॅपडील या कंपन्यांनी फेस्टिव्ह सेलचे जोरदार प्रमोशन केले आहे. फ्लिपकार्टने नवरात्राच्या दिवसांमध्ये आयोजित केलेला ‘बि‍ग बि‍लि‍यन डे‘ धमाकेदार ठरला. फ्लिपकार्टने पहिल्या 10 तासात 10 लाख उत्पादने विकली. यामध्ये 25 विविध उत्पादनांवर सवलत देण्यात आली. स्नॅपडीलकडून इलेक्ट्रॉ निक्स0 वस्तू आणि गॅझेट्‌सवर सवलत जाहीर केली आहे. ऑनलाइन विक्रीवर आणि ऍप्सवरील विक्रीवर घसघशीत सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर मेझॉन आणि स्नॅपडीलकडून सवलत योजनेसाठी तयारी केली जात आहे. पेटीएम या नव्या कंपनीनेही सवलतीसाठी जय्यत तयारी केली आहे. एका दिवसाच्या सेलमध्ये कित्येक वेळा अनेक ग्राहकांची ऑर्डर पूर्ण होत नाही. त्यामुळे या कंपन्यांकडून चार ते पाच दिवसांचे सेल आयोजित केले जात आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division