’पतंजली’ची उत्पादने आता बिग बझारमध्येही

421032 bigbazarpatanjaliबाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद‘ आणि किशोर बियाणींच्या ‘फ्युचर समूह‘ यांच्यात नुकताच करार झाला असून, फ्युचर समूहाच्या ‘बिग बझार‘ व इतर आऊटलेट्समध्ये पतंजलीची उत्पादने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

पतंजली ट्रस्टची आयुर्वेदिक उत्पादने प्रॉक्टर अँड गॅम्बल, इमामी व ज्योती लॅब्ससारख्या मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांना टक्कर देत आहेत. सध्या पतंजलीचे वार्षिक उत्पन्न 2500 कोटी रुपये असून ट्रस्टचे मूल्यांकन तब्बल चौदा हजार कोटी रुपये आहे. येत्या पाच वर्षात पतंजली समूहाचे पाच ते दहा हजार कोटी रूपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट आहे. तसेच या करारामुळे फ्युचर समूहाच्या ग्राहक संख्येतदेखील एक कोटींची भर पडणार आहे.

सध्या पतंजलीची वैयक्तिक निगा आणि अन्न क्षेत्रातील सर्वच प्रकारची उत्पादने आहेत. त्यात साबण, शॅम्पू, दातांची निगा राखणारी उत्पादने, बाम, त्वचेची क्रीम्स, बिस्कीटे, तूप, ज्यूस, मध, पीठ, मोहरी तेल, मसाले, साखर आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे .लवकरच पतंजली इन्स्टंट नूडल्स सारखी उत्पादने बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे.

पतंजलीचा जाहीरातींवरील खर्च खूप कमी असल्याने उत्पादनांची किंमत त्याच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या उत्पादन किंमतीच्या तुलनेत कमी आहे. इतर एफएमसीजी कंपन्यांची तुलना केली असता पतंजलीचा जाहीरातींवरचा खर्च देखील विक्रीच्या 20-30 टक्क्यांनी कमी आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division