आता 30 लाखांपर्यंतच्या घरासाठी 90 टक्के कर्ज!

1358329503 RBI 101आता रु. 30 लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरासाठी कर्जदारांना 90 टक्यांयव  पर्यंत कर्ज देण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिल्या आहेत. त्याचबरोबर गृहकर्जासंदर्भातील बॅंकांच्या जोखमीचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या पतधोरण आढाव्यात, रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर कमी केला होता. त्याला प्रतिसाद देत बॅंकांनीही आपल्या कर्ज योजनांवरील व्याजदर काही प्रमाणात कमी केले. आता रिझर्व्ह बॅंकेकडून 90 टक्के कर्ज देण्याच्या निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. यासंबंधी रिझर्व्ह बॅंकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सध्या रु. 20 लाखांपर्यंतच्या घरांसाठीच 90 टक्यांा   पर्यंत कर्ज मिळू शकत होते. मात्र, बहुतांश शहरांमध्ये घरांच्या किमती रु. 20 लाखांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे कर्जदाराला कर्ज घेण्याबरोबरच अतिरिक्त जास्त पैशांचीही तरतूद करावी लागत होती. यापुढे रु. 30 लाखांपर्यंत घर घेणार्या  ग्राहकांना 90 टक्के कर्ज देण्यात यावे, असे बॅंकांना सांगण्यात आले आहे. यामुळे कर्जदाराला केवळ 10 टक्के निधी उभा करावा लागेल. याचा अप्रत्यक्ष फायदा बांधकाम व्यवसायालादेखील होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division