टपाल विभागाचे राज्यभरात ७५ एटीएम!

India Post 010बँक स्थापनेकडे वाटचाल करणार्याम टपाल विभागाने महाराष्ट्र परिमंडळात चालू महिनाअखेर ७५ एटीएम सुरू करण्याचे निश्चित केले आहे. पैकी १७ एटीएम हे विभागाच्या मुंबई कार्यक्षेत्रांतर्गत असतील.

विभागाच्या ज्येष्ठ अधिकार्या ने सांगितले की, महाराष्ट्र परिमंडळातील एटीएम विस्तार कार्यक्रमांनुसार, नोव्हेंबरअखेर मुंबईत १७, औरंगाबादेत १७, नागपूरमध्ये १६, पुण्यात ११, तर गोव्यात १४ एटीएम बसविण्यात येणार आहेत.

टपाल विभागाच्या खातेदारांकरिता टपाल एटीएम कार्ड दिले जाण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, यामार्फत विभागाचे ई-खातेदार हे रक्कम काढण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतात, असेही सांगण्यात आले. संबंधित खात्यातील रक्कम काढण्यासाठी अथवा जमा करण्यासाठी विभागाचे खातेदार हे इतर कोणत्याही कोअर बँकिंग प्रणालीद्वारे हे व्यवहार करू शकतील, असेही नमूद करण्यात आले.

देशभरात १,००० एटीएमचे जाळे विणण्याचे टपाल विभागाचे लक्ष्य आहे. विभागाला परिपूर्ण बँक स्थापन करण्यासाठी सरकारची विशेष परवानगी मिळण्याच्या दिशेने सरकारची पावले पडत आहेत. दोन नव्या खासगी बँकांनंतर ११ पेमेंट बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेने यापूर्वीच प्राथमिक मंजुरी दिली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division