जनता सहकारी बँकेला प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार

Janata Sahakari Bankपाच हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी असणार्‍या सहकारी बँकांच्या वर्गवारीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल जनता सहकारी बँकेला ‘बँको पुरस्कार २०१५’ तर बँकिंग फ्रंटियर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार देण्यात आले.

बँको पुरस्काराचे वितरण गोव्याचे सहकारमंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. जनता सहकारी बँकेचे सह-महाव्यवस्थापक अभय बापट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बँकिंग फ्रंटियर मासिकाच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात ‘बेस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह’ आणि ‘बेस्ट एटीएम इनिशिएटिव्ह’ या दोन पुरस्कार जनता सहकारी बँकेने पटकावले. रिझव्‍‌र्ह बँकेचे निवृत्त महाव्यवस्थापक रत्नाकर देवळे यांच्या हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत केतकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division