मुंबई पोर्ट ट्रस्टची विक्रमी वाहन हाताळणी
मुंबई पोर्ट ट्रस्टने आर्थिक वर्षांतील आतापर्यंतच्या कालावधीत सर्वाधिक वाहन वाहतूक हाताळणी नोंदविली आहे. बंदरात एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान १,५३,६४७ वाहनांची चढ-उतार झाली. आधीच्या वर्षांतील याच कालावधीतील १,३९,८१२ वाहनांच्या तुलनेत यंदाची वाढ १८ टक्के राखली गेली आहे.
बंदराच्या ‘एम व्ही होग ट्रान्सपोर्टर’कडून नियंत्रित केले जाणाऱ्या फलाट क्रमांक २ वरून सर्वाधिक ५३७६ वाहनांची निर्यात झाली आहे. सर्वाधिक निर्यातीमध्ये फोक्सवॅगन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, अशोक लेलॅन्ड, महिंद्र अॅन्ड महिंद्र, जनरल मोटर्स यांची आघाडी राहिली. वाहन निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्या निवारणासाठी एक समिती नियुक्त केली गेली आहे. एसव्हीसी बँकेला