एसव्हीसी बॅंकेला पुरस्कार
सहकार क्षेत्रातील एसव्हीसी बँकेला ‘एबीपी न्यूज बीएफएसआय’द्वारे सहकारातील उत्तम बँक या पुरस्काराने अलीकडेच गौरविण्यात आले.
बँकेला ‘आयबीए’चा उत्कृष्ट तंत्रज्ञान पुरस्कारही मिळाला आहे. ‘आयबीए’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार सुहास सहकारी यांनी रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांच्या हस्ते स्वीकारला. बँकेच्या कर्मचार्यांचे परिश्रम या सन्मानामागे असल्याची भावना बँकेचे अध्यक्ष सुरेश हेमाडी यांनी व्यक्त केली आहे.