सुनील खन्ना ‘सीआयआय’ महाराष्ट्रचे अध्यक्ष
देशातील उद्योगांची संघटना असलेल्या भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र परिषदेवर सुनिल खन्ना यांची निवड झाली आहे.
एमरसन नेटवर्क पॉवर (इंडिया)चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असलेल्या खन्ना यांची ही नियुक्ती २०१६-१७ करिता असेल. याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून ओएमआर बागला ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स इंडियाचे संचालक रिषी कुमार बागला हे नियुक्त झाले आहेत.