'आयबीजेए'तर्फे ज्वेलरी अँड नॉलेज पार्कची उभारणी

सोन्याचे दागिने आणि ज्वेलरी उद्योगातील उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक यांची संघटना ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलरी असोशीएशन लिमिटेड’ (आयबीजेए) ‘मेक ईन इंडिया’या नवीन राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे.

या उपक्रमाची घोषणा करताना आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कंभोज म्हणाले, “परदेशी चलनाची सर्वाधिक उलाढाल करणारे आणि कुशल व अकुशल कामगारांना सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र असलेला हा आमचा उद्योग राष्ट्राच्या खजिन्यात नेहमीच महत्वपूर्ण योगदान देत आला आहे. या उद्योगाला जागतिक आणि स्थानिक बाजारपेठेत फार मोठे यश मिळावे या उद्देशाने आम्ही मुंबईजवळ‘आयबीजेए ज्वेलरी अँड नॉलेज पार्क’ची उभारणी करत आहोत. ५०० एकरवर उभे राहत असलेले हे पार्क देशातील अशाप्रकारचे पहिले पार्क असून त्यात ३०० एकरवर उत्पादन आणि तत्सम उपक्रमांसाठी एक वेगळे दालन असेल. त्याशिवाय त्यात प्रशिक्षण संस्था, संशोधन केंद्र, प्रदर्शन आणि परिषद केंद्रे, निवास, वसतिगृहे, शाळा, रुग्णालये आदिंचा समावेश उर्वरित २०० एकरवर असेल.”

या उपक्रमाची घोषणा करताना आयबीजेएने ‘मेक ईन इंडिया फॉर जेम्स अँड ज्वेलरी सेक्टर’, ‘मेक ईन महाराष्ट्र’, ‘स्कील्ड डेव्हलपमेंट इनिशीएटीव्ह बाय आयबीजेए’ आणि ‘आयबीजेए ज्वेलरी पार्क’ अशा चार लोगोंचे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र; केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते; केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राजीव प्रताप रुडी; महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष रावसाहेब दानवे; अर्थ व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार; गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता; उच्च, तंत्रशिक्षण व वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे; उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division