घोडावत समूह ग्राहकोपयोगी उत्पादनात

संजय घोडावत समूहाने आता ग्राहकोपयोगी उत्पादनांवर सर्वाधिक भर देण्याचे ठरविले आहे. त्याशिवाय ऊर्जानिर्मिती, फुलोत्पादन आणि शिक्षण या क्षेत्रांना यापुढच्या काळात प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती या समुहाकडून देण्यात आली आहे.

घोडावत कंझ्यूमर प्रॉडक्‍ट्‌स एलएलपी या विभागातर्फे "पो‘ या नावाने ग्राहकांसाठी "स्नॅक्‍स फूड‘मधील नवी उत्पादन श्रेणी नुकतीच सादर करण्यात आली. स्नॅक्‍स फूड‘च्या नव्या श्रेणीत पोटॅटो चिप्स, स्टिकीज आणि थिनलेट्‌स यांचा समावेश आहे. भारतातील ग्राहकांना परदेशी चवीचे स्नॅक्‍स योग्य किमतीत उपलब्ध करून देताना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चवींचे योग्य मिश्रण त्यात असणार आहे तसेच इटालियन फूड प्रेमींसाठी पिझ्झा फ्लेवर, मेक्‍सिकन फूड प्रेमींसाठी जॅलपेनो फ्लेवर, तसेच इस्टर्न टॅंगो ज्युसी चवीसाठी थाईस्वीट चिली अशा प्रकारचे अनेक स्वाद उपलब्ध करण्यात आले आहेत.

घोडावत समूहातील व्यवसायात पान मसाल्याचा वाटा अत्यल्प राहणार असल्याचे स्पष्ट करून श्री घोडावत यांनी यापुढच्या काळात ऊर्जानिर्मिती, फुलोत्पादन आणि शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी अधिक गुंतवणूक केली जाणार असल्याचे नमूद केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division