कंपन्यांच्या अकाउंटिंगचे नियम बदलणार

जगभरातील विविध कंपन्यांनी त्यांच्या अकाउंटिंगच्या पद्धतीत ‘आयएफआरएस’ म्हणजेच ‘इंटरनॅशनल फायनान्शिअल रिपोर्टिंग स्टॅंडर्डस’ नियमांनुसार बदल करण्यास सुरवात केली आहे. १ एप्रिल २०१५ पासून भारतातही ‘आयएफआरएस’ नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या आर्थिक वर्षासाठी जरी या नियमांची अंमलबजावणी ऐच्छिक असली तरी एक एप्रिल २०१६ पासून या नियमांची अंमलबजावणी अनिवार्य होणार आहे. या नियमांचा मूळ उद्देश हा अकाउंटिंगमध्ये सुसूत्रता आणणे आणि अकाउंट्‌स तयार करताना समान तत्त्वांचे पालन करणे हा आहे. या नियमांमुळे प्रामुख्याने कंपन्यांची नफा-तोटा आणि ताळेबंद ही महत्त्वाची स्टेटमेंट्‌स तयार करण्याच्या पद्धतीत समानता आणि एकसूत्रीपणा येईल. युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, रशिया या देशातही ‘आयएफआरएस’ नियमांची अंमलबजावणी यापूर्वीच झालेली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division