'व्हिडीओकॉन' बाजारहिस्सा दुपटीने वाढवणार

उन्हाळ्याच्या हंगामात वातानुकूलित यंत्राची श्रेणी विस्तारताना व्हिडीओकॉनने दुप्पट बाजारपेठ गाठण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे तसेच देशातील विक्री केंद्रेही दुपटीवर नेण्याचा संकल्प सोडला आहे. कंपनीने नुकतीच या श्रेणीतील दोन नव्या उपकरणांची भर घातली. क्वांटम एज तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या यंत्राद्वारे उच्च दर्जाची सेवा बहाल करत असल्याचा दावा कंपनीने केला. नव्या उत्पादनांच्या जोरावर २०१५ अखेरपर्यंत वातानुकूलित यंत्र बाजारपेठेतील १२ टक्के हिस्सा काबीज करण्यात येईल, असा विश्वास या वेळी कंपनीच्या तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अक्षय धूत यांनी व्यक्त केला. देशातील कंपनीच्या उपकरणांची दालन विक्री संख्याही सध्याच्या ४,५०० वरून ९,५०० वर नेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

बीईईच्या तीन व पाच तारांकित दर्जाने सन्मानित या उपकरणाची किंमत ३७,९९० व ४५,४९० रुपये आहे. अशी माहिती या वेळी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र विभागाचे मुख्य परिचलन अधिकारी संजीव बक्षी यांनी दिली. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे उत्पादन विक्री प्रकल्प असलेल्या व्हिडीओकॉनचा तामिळनाडूतील मदुराई येथे नवा प्रकल्प वर्षअखेर सुरू होईल, असेही या वेळी सांगण्यात आले. यामुळे कंपनीची सध्याची उपकरण निर्मिती क्षमता वार्षिक २.५ लाखांवरून ५ लाखांपेक्षा अधिक होईल, असेही नमूद करण्यात आले. व्हिडीओकॉनने यंदाच्या हंगामातच वाय-फायवर आधारित वातानुकूलित यंत्र सादर केले होते. कंपनीचे उपकरणांची संख्या वर्षभरात ३६ वरून ६५ झाली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division