औद्योगिक उत्पादन पूर्वपदावर

industrial productनिश्चलनीकरणाची जळमटे झटकत, २०१७ च्या पहिल्या महिन्यांत देशातील उद्योगक्षेत्राने उभारी घेतल्याचे त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये २.७ टक्क्यांपर्यंत उंचावलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. उद्योगक्षेत्राची पुन्हा एकदा वाढीच्या मार्गावर वाटचाल सुरू झाल्याचे हे द्योतक मानले जाते.

भांडवली वस्तूसारख्या क्षेत्रातील १०.७ टक्के वाढीच्या प्रतिसाद जोरावर यंदा एकूण औद्योगिक उत्पादनात भर पडली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत हे क्षेत्र तब्बल २१.६ टक्क्यांनी घसरले होते, तर डिसेंबर २०१६ मध्ये एकूण औद्योगिक उत्पादन दर शून्यात (०.१ टक्के) होता.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये, ऐन निश्चलनीकरणात औद्योगिक उत्पादन ५.५३ टक्क्यांनी वाढले होते. तर वर्षभरापूवी, जानेवारी २०१६ मध्ये ते १.६ टक्के असे घसरते होते.

ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राची वाढ जानेवारी २०१६ मधील ०.१ टक्क्यावरून यंदा सुधारून १ टक्के झाली आहे. तर विद्युत उपकरणनिर्मिती २.९ टक्क्यांनी वाढली आहे. खनिकर्म क्षेत्राची वाढ ५.३ टक्के ऊर्जानिर्मिती ३.९ टक्के राहिली आहे.

औद्योगिक उत्पादननिर्मिती क्षेत्रातील २२ पैकी ९ क्षेत्रांची वाढ जानेवारीमध्ये सकारात्मक राहिली आहे. चालू आर्थिक वर्षांत (एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१७) आतापर्यंत औद्योगिक उत्पादन दर अवघ्या ०.६ टक्क्यांची वाढ राखून आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील २.७ टक्क्यांच्या तुलनेत यंदाचा दर खूपच कमी आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division