आदित्य बिर्ला नुव्हो आणि ग्रासीमचे एकीकरण

birlaग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, आदित्य बिर्ला नुव्हो आणि आदित्य बिर्ला सर्विसेस यांच्या भागधारकांच्या नुकत्याच झालेल्या स्वतंत्र सभेत एबीएनएलचे एकीकरण ग्रासिमबरोबर करण्यास तसेच त्यानंतर वित्तीय सेवा व्यवहारांचे एनसीएटी आणि सेबीच्या नियमांनुसार नोंदणी करण्यास मान्यता मिळाली आहे.

आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यासंदर्भात म्हणाले, या एकीकरणामुळे तयार होणारी कंपनी ही भारतातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक असणार आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या कंपनीच्या कार्यकक्षेत उत्पादनापासून ते सेवा व्यापारापर्यंतचे सर्व व्यवहार येणार असून सिमेंट, वित्तीय सेवा, दूरसंचार, वस्त्रोद्योग आणि रसायननिर्मिती क्षेत्रांमध्ये ती अग्रेसर बनू शकेल.' आदित्य बिर्ला समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी सुनील अग्रवाल यांनी सांगितले की, "ग्रासीमची भक्कम पाश्र्वभूमी वित्तीय सेवा व्यापाराच्या क्षेत्रातील स्पर्धेत अग्रेसर राहण्यासाठी फायदेशीर ठरेल. दोन्ही कंपन्यांच्या भागधारकांना या संरचनात्मक विकासाच्या वाटचालीत सहभागी होता येणार आहे.'

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division