औद्योगिक उत्पादन दर किमान स्तरावर

Untitled 20 14निर्मिती क्षेत्राच्या सुमार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन दर पुन्हा घसरला आहे. १.२ टक्के दर हा गेल्या चार महिन्यांतील किमान स्तरावर तो नोंदला गेला आहे.

दोन महिन्यांपूर्वी निर्मिती क्षेत्रातून तसेच भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रातून असलेल्या कमी मागणीमुळे यंदा औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक खाली आला आहे. वर्षभरापूर्वी, फेब्रुवारी २०१६ मध्ये हा दर १.९९ टक्के होता. तर एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या गेल्या आर्थिक वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांतील औद्योगिक उत्पादन ०.४ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधी दरम्यान हा दर २.६ टक्के होता.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमधील औद्योगिक उत्पादन जाहीर करताना जानेवारीमधील दर आधीच्या २.७४ टक्क्यांवरून सुधारून ३.२७ टक्के केला आहे.

औद्योगिक उत्पादन दर यापूवी ऑक्टोबर २०१६ मध्ये १.८७ या आतापर्यंत किमान स्तरावर होता. निश्चलनीकरणाच्या, नोव्हेंबर महिन्यात त्यात तब्बल ५.५९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

यंदा हा निर्देशांक खाली येण्याचे प्रमुख कारण निर्मिती क्षेत्र राहिले आहे. फेब्रुवारीमध्ये निर्मिती क्षेत्राची घसरण २ टक्क्यांपर्यंत राहिली आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्राच्या निर्देशांकात निर्मिती क्षेत्राचा वाटा सर्वाधिक तब्बल ७५ टक्के आहे. वर्षभरापूर्वी निर्मिती क्षेत्र अवघ्या ०.६ टक्क्याने विस्तारले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये भांडवली वस्तू निर्मिती क्षेत्राची वाटचालही घसरून ३.४ टक्के झाली आहे. तसेच ग्राहकपयोगी वस्तू निर्मिती ५.६ टक्क्यांनी खाली आली आहे. बिगर ग्राहकपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्राची घसरण ८.६ टक्के झाली आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्राच्या निर्देशांकात समाविष्ट होणाऱ्या एकूण २२ उद्योगांपैकी १५ उद्योगांची वाढ यंदा खुंटली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division