इबे आता फ्लिपकार्टकडे

flipcart ebayमायक्रोसॉफ्ट, टेनसेंटसह फ्लिपकार्टने इबे इंडिया १.४ अब्ज डॉलरना खरेदी करण्याचे ठरविले आहे. इ कॉमर्स क्षेत्रातील ही ऐतिहासिक गुंतवणूक मानली जात आहे.

भारताच्या इ कॉमर्स क्षेत्रातील इबे इंडिया ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र फ्लिपकार्ट, अॅरमेझॉन, स्नॅपडिलच्या स्पर्धेत ती गेल्या काही वर्षांमध्ये मागे पडली. स्नॅपडीलच्या विक्रीची चर्चा सुरू असतानाच इबे इंडियाबाबत व्यवहार पूर्णत्वास आला.

समभागांच्या रुपात करण्यात आलेल्या या व्यवहारामुळे इबेचा भारतातील व्यवसाय आता फ्लिपकार्टच्या अखत्यारीत येईल. मात्र त्याचे देशात स्वतंत्र अस्तित्व राहिल. फ्लिपकार्टमध्ये टायगर ग्लोबल, एस्सेल पार्टनर्स, डीएसटी ग्लोबलसारख्याही भागीदार आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division