इंधन अधिभार एक टक्क्यावर

Petrol price up by Rs 1.39 per litre diesel by Rs 1.04डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एसबीआय कार्डने इंधन अधिभार (सरचार्ज) अडीच टक्क्यांवरून घटवून एक टक्क्यावर आणला आहे. या निर्णयाचा फायदा एसबीआय कार्डच्या चाळीस लाख ग्राहकांना होणार आहे.

एसबीआय कार्डतर्फे नुकतेच या संदर्भातील एक निवेदन जारी करण्यात आले. ‘२६ एप्रिलपासून क्रेडिट कार्डवर पेमेंट केल्यानंतर एसबीआय कार्डवरील इंधन अधिभार अडीच टक्क्यांऐवजी एक टक्के आकारण्यात येणार आहे,‘ असे निवेदनात म्हटले आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division