रवांड एअरचे मुंबईमार्गाद्वारे आशियात पाऊल

rwand airमुंबई: आफ्रिकेतील रवांडा देशातील सार्वजनिक हवाई प्रवासी वाहतूक कंपनी असलेल्या रवांड एअरने किगाली ते मुंबई अशी थेट विनाथांबा सेवा सुरू करून आशिया भागात प्रवेश केला आहे. एरवी युरोपमधून उपलब्ध असलेल्या या मार्गामुळे आता वेळ व पैशाची निम्म्यापर्यंत बचत होणार आहे. भारतातील नवी दिल्ली, बंगळूरु शहरांसह चीनमधील अनेक शहरांना भविष्यात जोडून रवांड एअरसाठी भारत हे आशियाचे प्रवेशद्वार व्यवसायाकरिता निश्चित करण्यात येत असल्याचे रवांड एअरच्या जागतिक विक्री विभागाचे संचालक अलेक्स बुटेरे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय विस्ताराकरिता रवांडाकरिता भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असल्याचेही ते म्हणाले.

रवांड एअर आफ्रिकेतील १९ शहरांमध्ये सध्या देशांतर्गत हवाई वाहतूक प्रवासी सुविधा देते. देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठेत रवांड एअरचा ८० टक्के हिस्सा आहे. रवांडातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळाची सध्या ३५ लाख वार्षिक प्रवासी हाताळणी आहे. दुसरे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१९ पर्यंत तयार झाल्यानंतर हे प्रमाण येत्या दशकभरात एक ते दीड कोटी प्रवासी होणार आहे.

रवांड एअर नवी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक सेवा येत्या काही दिवसांत हरारे (झिम्बाब्वे) व लंडन (ब्रिटन) येथे सुरू करणार आहे. तर चीनमधील क्वान्झोऊ आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्येही येत्या काही महिन्यांमध्ये कंपनीची आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक सेवा सुरू होईल. येत्या वर्षभरात नवीन आठ आंतरराष्ट्रीय मार्ग आफ्रिकेशी कंपनीच्या माध्यमातून जोडले जातील.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division