कृषी उत्पन्नाला कर लावण्याची योजना नाही: अर्थमंत्री अरुण जेटली

arun jaitely gst tax reuters 650x400 81448280899नीती आयोगाचे सदस्य विवेक देवरॉय यांनी शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या सूचनेला स्पष्ट शब्दांत नकार देत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारची अशी कोणतीच योजना नसल्याचे सांगितले आहे.

संविधानामध्ये करण्यात आलेल्या उत्पन्नाच्या विभाजनामुळे शेतीमधील उत्पन्नावर कर लावताच येत नसल्याचे कृषिमंत्र्यांनी अलीकडेच स्पष्ट केले. नीती आयोगाचे सदस्य देवरॉय यांनी मांडलेले मत, त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत अर्थमंत्र्यांनी त्याच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. नीती आयोगाने तीन वर्षांसाठी बनवलेल्या कृती आराखड्यावर आधारित पत्रकार परिषदेमध्ये देवरॉय यांनी सरकारी उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी उत्पन्नावर कर लावण्याचा तसेच ग्रामीण भागाला करांतर्गत आणण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. वैयक्तिक प्राप्तिकरावर असलेली सवलत रद्द करायला हवी, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. यामुळे सामाजिक क्षेत्रातील योजनांसाठी जास्त निधी उपलब्ध होईल, असे मत त्यांनी मांडले होते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division