कॉसमॉस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सुहास गोखले

suhas gokhaleकॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सुहास गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सन १९८३ पासून गोखले बॅंकेच्या सेवेत असून आत्तापर्यंत त्यांनी शाखा तसेच विभागीय कार्यालय येथे विभागप्रमुख व मुख्य कार्यालयात मुख्य महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्याचबरोबर कर्जविभाग, वसुली विभाग, अनुत्पादित कर्ज व्यवस्थापन, लेखापरीक्षण व तपासणी इत्यादी विभागांचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. इतर १५ लहान सहकारी बँकांचे कॉसमॉस बँकेत विलीनीकरण करून घेताना गोखले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

व्यवस्थापकीय संचालकपदी पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी बँकेचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division