देशांतर्गत रिटेल व्यवसायाला झळाळी

Retail Banner वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी देशात रिटेल हे एक क्षेत्र आहे. आणखी ही फक्त सुरुवात आहे. एफआयडीच्या (परकीय थेट गुंतवणूक) अटींमधील शिथिलता आणि सध्याच्या सरकारकडून व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न यामुळे अनेक ब्रँड भारतात येण्याच्या तयारीत आहेत. भारतीय ब्रँडसुद्धा त्यांचा व्यवसाय विस्तार करत असून स्टोअर तसेच वितरण जाळ्याचा विस्तार करत आहेत. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया -Knight Frank यांच्या ‘थिंक इंडिया थिंक कनेक्टेड रिटेल’ या अहवालानुसार आघाडीच्या सहा रिटेल बाजारपेठेतील आधुनिक रिटेल बाजारपेठ सध्याच्या 871 अब्ज रुपयांवरून 2019 पर्यंत 1718 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आधुनिक रिटेल उद्योगाची संख्याही सध्याच्या 19 टक्क्यांवरून येत्या 3 वर्षात 24 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील रिटेल उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत.

ब्रँड, प्रकार आणि अनुभवाचा विचार करता देशातील रिटेल क्षेत्र विविधतेने भरलेले आहे. नजिकच्या काळात सुरू झालेले काही मॉल्स हे जागतिक दर्जाचे आहेत. त्याच्याकडील आकर्षणामुळे सर्व वयोगटातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात तिथे येतात, प्रामुख्याने विविध परदेशातील फॅशन ब्रँड, तत्काळ सुविधा देणाऱ्याच्या काही चेन्स आणि मनोरंजनाचे पर्याय यामुळे तरूण मोठ्या प्रमाणात तिकडे आकर्षित होतात. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी रिटेल क्षेत्रातील युवकांच्या करिअरसंबंधी पुढील मनोगत व्यक्त केले आहे. "ग्लॅमर आणि रंजकता यापलीकडे रिटेल क्षेत्र तरूण खरेदीदारांना एक आकर्षक व समाधानकारक करिअरसुद्धा देते. व्यापार, व्यवस्थापन, ई-कॉमर्स, अकाऊंट, कायदेशीर बाबी, पुरवठा व वाहतूक आणि व्यवसाय व्यवस्थापन या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होतात. सर्वात सोपा मार्ग म्हणजे रिटेल स्टोअरमध्ये समर इंटर्नशिप यासाठी अर्ज करणे व हे काम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही याची चाचपणी करणे. पण रिटेल क्षेत्रात करियरबाबत तुम्ही गंभीर असाल तर उत्तम मार्ग म्हणजे, रिटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेणे. देशातील रिटेल क्षेत्राची सर्वोच्च संघटना असलेल्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून रिटेल व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि रिटेल क्षेत्रातील बॅचलर ऑफ बिझनेस अडमिनिस्ट्रेशन या अभ्यासक्रमांना पाठबळ दिले जाते.

रिटेल व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना रिटेल क्षेत्रात प्रगतीचा वेगवान मार्ग मिळतो. इतर काही उद्योगांप्रमाणे यामध्ये सुरुवातीच्या काळात फार वेतन नसते पण करियरमध्ये जलदरित्या प्रगती करता येते. सर्वसाधारणपणे रिटेल व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या योग्य प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षातच मोठी जबाबदारी आणि भरघोस वेतन दिले जाते. कौशल्य आणि अनुभवाच्या रुपाने त्यांना मिळणारे ज्ञान अमूल्य असते. अनेक विद्यार्थी स्वतःच्या जबाबदारीवर संपूर्ण स्टोअर चालविण्याची जबाबदारी घेतात जी एखादा नफा मिळवून देणारा उद्योग किंवा स्वतःचा व्यवसाय चालविण्यासारखी असते. त्यातील काही त्यांच्या विभागाचे व्यवसाय प्रमुख म्हणून निवडले जातात जिथे एखाद्या सीईओसारखीच मनुष्यबळ व्यवस्थापन, उलाढाल, व्यवस्थापन व निष्ठा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. अतिरीक्त जबाबदारीसह वेतनात चांगली वाढही मिळते. त्यामुळे चौथ्या वर्षात रिटेल मॅनेजमेंटमधील पदवीधराला इतर क्षेत्रातील त्यात पातळीवरील उमेदवारापेक्षा अधिक उत्पन्न मिळते. अशाप्रकारची व्यवसायवृद्धी इतर व्यवसायांमध्ये क्वचितच आढळून येते.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division