अपारंपरिक ऊर्जेसाठी मोठी गुंतवणूक

Solar Pic 1अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीत भारताने अमेरिकेला पिछाडीवर टाकून दुसरा क्रमांक मिळवला आहे. या क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे चीनने पहिले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. ब्रिटनमधील ‘अर्न्स्ट अँड यंग’च्या एका अहवालातून खालील बाबी समोर आल्या आहेत.

- अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील वार्षिक क्रमवारीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने अमेरिकेला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी अमेरिका पहिल्या स्थानावर होता.
- अहवालानुसार २०१५नंतर प्रथमच अमेरिका ४० देशांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
- गेल्या वर्षी ‘रिन्युएबल एनर्जी कंट्री अॅट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स’ अर्थात ‘आरईसीएआय’मध्ये भारत तिसऱ्या स्थानी होता.

सरकारी पाठिंबा कारणीभूत

‘अर्न्स्ट अँड यंग’च्या अहवालानुसार भारतात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला केंद्र सरकारने चांगलाच पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची उत्पादन क्षमता २०२२पर्यंत वाढवून १,७५,००० मेगावॉटपर्यंत नेण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

उत्पादनात मोठी वाढ

अहवालानुसार देशातील सौरऊर्जा क्षेत्रातील उत्पादन क्षमतेत वाढ होत आहे. २०१४मध्ये सौरउर्जेचे उत्पादन २६०० मेगावॉट होते. गेल्या तीन वर्षांमध्ये त्यामध्ये १०,००० मेगावॉटची भर पडली आहे. या शिवाय पवनऊर्जा क्षेत्रात २०१६-१७मध्ये ५,४०० मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात आली. आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात १२,५०० मेगावॉटची भर पडली. तर, परंपरागत स्त्रोतांच्या माध्यमातून १०,२०० मेगावॉट ऊर्जेची भर पडली.

किमतीत घसरण

- देशात सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या उत्पादनांच्या किमती सातत्याने घटत आहेत. मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे उपकरणांची किंमत घटत आहे. देशातील औष्मिक ऊर्जा केंद्रांद्वारे निर्मित उर्जेच्या तुलनेत सौरउर्जेद्वारा निर्मिती ऊर्जा अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होत आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division