धान्ये, दूध जीएसटीमुक्त!

gstवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या श्रीनगर येथील बैठकीत सुमारे ८० ते ९० टक्के वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या करदराविषयी एकमत झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या परिषदेत धान्य आणि दुधाला जीएसटी कक्षेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. या शिवाय अन्नधान्यावर सर्वांत कमी दराने कर आकारण्यालाही संमती देण्यात आली आहे. येत्या एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

या बैठकीत प्रत्येक विभागातील वस्तूच्या दराविषयी चर्चा करण्यात आली. गरज भासल्यास वस्तू आणि सेवा यांच्यावर नेमका किती कर आकारावा या बाबत पुन्हा चर्चा करण्यात येईल, असेही जेटली यांनी नमूद केले. मूल्यवर्धित कर विवरणपत्र (व्हॅट रिटर्न) आणि एका कराकडून दुसऱ्या कराकडे रुपांतरीत होणे (ट्रान्झिशन रूल्स) सोडून अन्य सात नियमांवर सहमती झाली आहे. कायदेविषयक समितीने या दोन नियमांवर चर्चामसलत करण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितल्याचेही जेटली यांनी नमूद केले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division