जनता बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले

Sanjay Leleजनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी संजय लेले, तर उपाध्यक्षपदी जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

बॅंकेचे निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांची मुदत २०१७ ते २०२२ या पाच वर्षांसाठी राहणार आहे. बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे- १) सर्वसाधारण मतदार संघ- विद्यानंद देवधर, जगदीश कदम, डॉ. मधुरा कसबेकर, बिरू खोमणे, संजय लेले, माधव माटे, सुनील मुतालिक, सुधीर पंडित, प्रभाकर परांजपे, लक्ष्मण पवार, महेंद्र पवार, मोहन फडके, किशोर शहा व अमित शिंदे, २) अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघ- रामदास शिंदे, ३) महिला राखीव मतदार संघ- अॅड. गौरी कुंभोजकर व अॅड. अलका पेटकर. याचवेळी अरविंद खळदकर आणि विजय भावे यांची तज्ज्ञ स्वीकृत संचालकपदी एकमताने नेमणूक करण्यात आली.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division