जेएमडी मेडिकोचा महाराष्ट्रात विस्तार

jmd medicoजेएमडी मेडिको सर्विस लिमिटेडने संपूर्ण भारतात बहुविध उत्पादनांच्या श्रेणींचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. जेएमडी व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी असून शेअरबाजारत नोंदणीकृत आहे. ही आयुर्वेदिक कंपनी असून तिचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. त्यांनी राज्यात 100% आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादने दाखल केली आहेत.

जेएमडी मेडिकोच्या महाराष्ट्रातील प्रवेशामुळे त्यांच्या राष्ट्रीय वृद्धी धोरणाला साह्य मिळेल. कंपनीने मुंबईत लॉजिस्टिक सेंटर स्थापन केले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रासोबत शेजारील राज्यांमध्ये स्थानिक मागणीची पूर्तता करण्यात येईल. भारतातील पूर्वेकडील मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने कोलकात्यातही लॉजिस्टिक सेंटर आहे.

कंपनीने सांगितले की, 2015 मध्ये जेएमडी मेडिकोच्या प्रवासाला सुरवात झाली. आयुर्वेदाच्या मदतीने आरोग्यदायी जीवनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. जेएमडी मेडिकोने देशाच्या पूर्वेकडील भागात यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या बाजारपेठेत 100% आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादनांची बहुविध श्रेणी दाखल केली आहे. जेएमडी मेडिकोचा उद्देश हा आरोग्य, त्वचा, केस, शारीरिक समस्यांसंबंधी आयुर्वेदिक उद्योगक्षेत्रातील मातब्बर होण्याचे आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलीओत केस, त्वचा, आरोग्य, शरीर निगा संबंधित 18 उत्पादनांचा समावेश आहे. आपले लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण भारतातून 5000 रिटेलर्सचा समावेश करण्याची योजना कंपनीने आखली आहे. जेएमडी मेडिकोची सर्व उत्पादने ही 100% नैसर्गिक वनस्पतीजन्य आहेत, त्यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. जेएमडी मेडिको गुड मॅन्युफक्चरिंग प्रॅक्टीसेस (जीएमपी) सोबत जोडले असून 100% वनस्पतीजन्य प्रमाणपत्र धारक आहे. असे कंपनीचे अध्यक्ष जगदिश पुरोहित यांनी सांगीतले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division