‘मारुती’ ला १५५६ कोटींचा नफा

marutiमारुती सुझुकीने जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत ४.४ टक्के वाढीसह रु. १,५५६ कोटींचा नफा नोंदवला आहे.

सुटे भाग आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीचा उत्पादन खर्च वाढला आहे. शिवाय देशभरात वस्तू व सेवाकर लागू झाल्याने देशांतर्गत विक्रीकरात बदल झाला आहे. करात झालेल्या बदलाचा देखील कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. या दरम्यान कंपनीच्या उत्पन्नात १७ टक्यांा ची वाढ झाली आहे. ते आता रु. २०,४६० कोटींवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. १४,६५४.५ कोटींची विक्री नोंदविली होती. मारुती सुझुकी इंडियाने सरलेल्या तिमाहीत ३,९४,५७१ वाहनांची विक्री केली. त्यात तिमाहीत आधारावर १७ टक्यांटी ची वाढ झाली आहे. यामध्ये परदेशात २६,१४० वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division